सोनेवाडीत बिबट्याने केल्या दोन शेळ्या फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST2021-09-08T04:26:26+5:302021-09-08T04:26:26+5:30

सोनेवाडी येथील विठ्ठल दशरथ गुडघे यांच्या वस्तीवर शेडमध्ये बांधलेल्या शेळ्यांची शिकार यांनी केली. शेतीचे व इतर काम असल्याने रात्री ...

Two goats killed by leopard in Sonewadi | सोनेवाडीत बिबट्याने केल्या दोन शेळ्या फस्त

सोनेवाडीत बिबट्याने केल्या दोन शेळ्या फस्त

सोनेवाडी येथील विठ्ठल दशरथ गुडघे यांच्या वस्तीवर शेडमध्ये बांधलेल्या शेळ्यांची शिकार यांनी केली. शेतीचे व इतर काम असल्याने रात्री कुटुंब झोपेत असताना बिबट्याने डाव साधला. सकाळी विठ्ठल गुडघे त्यांना सकाळी संबंधित प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ उपसरपंच किशोर जावळे त्यांना माहिती दिली. संतोष गुडघे, सचिन गुडघे यांनी परिसरात बिबट्या असल्याचे माग शोधले. गेल्या महिन्यातही या बिबट्याने शिकार केल्याच्या घटना घडल्या होत्या. उपसरपंच किशोर जावळे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांनी वन विभागाचे शेळके यांना दिली. घटनास्थळी येऊन या शेळ्यांचा पंचनामा करण्याचे वन विभागाने सांगितले. घडलेल्या प्रकाराचा पंचनामा करून या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी उपसरपंच जावळे यांनी वन विभागाकडे केली आहे.

Web Title: Two goats killed by leopard in Sonewadi