भरदिवसा गंठण ओरबाडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST2021-09-24T04:24:32+5:302021-09-24T04:24:32+5:30

चोरट्यांनी गंठण ओरबाडण्याच्या प्रयत्नात रोहिणी यांना धक्का लागून त्या खाली पडल्या. त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे लोकांची गर्दी जमली. त्यांचे ...

Trying to untie the knot all day | भरदिवसा गंठण ओरबाडण्याचा प्रयत्न

भरदिवसा गंठण ओरबाडण्याचा प्रयत्न

चोरट्यांनी गंठण ओरबाडण्याच्या प्रयत्नात रोहिणी यांना धक्का लागून त्या खाली पडल्या. त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे लोकांची गर्दी जमली. त्यांचे गंठण तुटले; मात्र ते धाग्यालाच अडकून राहिले. गर्दी होऊ लागताच चोरटे दुचाकीवरून धूम ठोकत फरार झाले. काही लोकांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या रस्त्यावर असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलीस तपासणार आहेत. त्यानंतर तपासाची दिशा ठरविणार आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी सबनीस यांच्या निवासस्थानी जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या.

शहर पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी घटना घडूनही फिर्याद नोंदविली गेली नाही. गुन्हा दाखल नसल्याचे ठाणे अंमलदारांनी सांगितले. गंठण चोरीच्या घटनेच्या माहितीवरून तपास सुरू केला असल्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी सांगितले.

----------

Web Title: Trying to untie the knot all day