शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील सहकार मोडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: January 12, 2016 23:36 IST

संगमनेर : महाराष्ट्राइतकी सक्षम सहकार चळवळ इतर कुठल्याही राज्यात नाही. सर्वाधिक काम सहकार क्षेत्रात झाले. मात्र, आज सहकार मोडायचा धंदा सुरू आहे.

संगमनेर : महाराष्ट्राइतकी सक्षम सहकार चळवळ इतर कुठल्याही राज्यात नाही. सर्वाधिक काम सहकार क्षेत्रात झाले. मात्र, आज सहकार मोडायचा धंदा सुरू आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल, त्यांच्यावर जरूर कारवाई करा. पण, सहकार मोडू नका, असे रोखठोक प्रतिपादन माजी वनमंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी केले. संगमनेर येथे मंगळवारी जाणता राजा मैदानावर स्व. अण्णासाहेब शिंदे व भाऊसाहेब थोरात जयंती महोत्सवाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. उल्हास पवार होते. व्यासपीठावर गुलाबराव शेळके, डॉ. हमीद दाभोलकर, अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, माजी आ. भानुदास मुरकुटे, जयंत ससाणे, पंडित थोरात, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कांचन थोरात, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधव कानवडे, अरुण कडू, रणजीत देशमुख आदी उपस्थित होते. कदम पुढे म्हणाले, सहकार चळवळीमुळे राज्यात मोठे काम झाले. चळवळीत काही ध्येयवादी तर काही मोडणारे आहेत. स्व. भाऊसाहेब थोरात हे सहकार चळवळीचा आदर्श आहेत. शिंदे, थोरात यांनी मोठे काम या क्षेत्रात केले. सामान्यांना ताकद देणारी ही चळवळ आहे. अडचणीत आलेले साखर कारखाने खासगीत विकू नका तर ते सहकाराकडे द्या, असे धोरण मी सहकारमंत्री असताना घेतले होते. पण, या सरकारने त्या उलट केले. भारती विद्यापीठ बोळीत काढल्याची चर्चा व्हायची. आपण वादळातून दिवा लावला, असे त्यांनी सांगितले. मुक्ता दाभोलकर यांनी स्व. थोरात व दाभोलकर यांचे काम एकमेकांशी पूरक होते. जादूटोणा कायदा ही शासनाची देणगी असून २०० केसेस दाखल झाल्या आहेत. जातपंचायत मोडण्याचे मोठे काम नगर जिल्ह्यात झाले. अंनिसचे काम वाढविणे हेच दाभोलकर यांच्या खूनाला उत्तर असल्याचे सांगितले. हमीद दाभोलकर यांनी २९ महिने उलटूनही स्व. दाभोलकर यांच्या खुनाचा तपास लागत नाही. कॉ. गोविंद पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्या होवूनही ‘मॉर्र्निंग वॉक’ ला येण्याचे आव्हान दिले जाते, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. देश अवघड कालखंडातून जात आहे. प्रश्न विचारणाऱ्यांना गोळ्या घातल्या जात आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम कुठल्याही देव-धर्माविरुद्ध नाही. तर त्याआडून होणाऱ्या शोषणाविरुद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कदम, दाभोलकर व शेळके यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. प्रास्ताविक आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व प्रकाश बर्डे यांनी करून आभार मानले. (प्रतिनिधी) पुरस्काराची रक्कम अंनिसला माजी मंत्री आ.पतंगराव कदम यांनी पुरस्काराची एक लाखाची रक्कम अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर गुलाबराव शेळके यांनी अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेला दिली.