Pulwama Terror Attack : एक तास अधिक काम करून शहिदांना श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 14:50 IST2019-02-15T14:42:07+5:302019-02-15T14:50:17+5:30
एक तास अधिक काम करण्याचा निर्णय घेऊन आज शिर्डी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी शहीद जवानांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Pulwama Terror Attack : एक तास अधिक काम करून शहिदांना श्रद्धांजली
शिर्डी - एक तास अधिक काम करण्याचा निर्णय घेऊन आज शिर्डी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी शहीद जवानांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भारतीय नागरिक अशा भ्याड हल्ल्याला भीक घालणार नाही, उलट देश हिताला प्राधान्य देईल व आपल्या मातृभूमीसाठी शहीद झालेल्या वीर जवानांना अभिवादन करेल याच भावनेतून नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी दररोज पेक्षा आज एक तास अधिक काम करून श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला आहे.
नगराध्यक्ष योगिता अभय शेळके व मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या पुढाकारातून नगर पंचायतमध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्यावतीने मुख्य लिपिक मुरलीधर देसले यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने हा निर्णय जाहीर केला. यावेळी मुख्याधिकारी सतीश दिघे, नगरसेवक शहर भाजपाचे अध्यक्ष शिवाजी गोंदकर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष व नगरसेविका अनिताताई जगताप व नगरसेवक असलेले मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते आदींनीही श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी जवानांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.