शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
4
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
5
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
6
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
7
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
8
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
9
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
10
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
11
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
12
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
13
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
14
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
15
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
16
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
17
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
18
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
19
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
20
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलांना मिळणार स्नेह

By admin | Updated: July 14, 2023 12:01 IST

श्रीगोंदा : आदिवासी जमातीतील मुलांसाठी पुढारलेल्या समाजाचा स्नेह मिळणे ही दुरापास्त गोष्ट़ त्यातच पिढ्यान्पिढ्या गुन्हेगारांचा शिक्का माथी लागलेल्या पारधी समाजाच्या मुलांना थेट झिडकारले जाते़

 श्रीगोंदा : नेहमीच उपेक्षित जीवन जगणार्‍या आदिवासी जमातीतील मुलांसाठी पुढारलेल्या समाजाचा स्नेह मिळणे ही दुरापास्त गोष्ट़ त्यातच पिढ्यान्पिढ्या गुन्हेगारांचा शिक्का माथी लागलेल्या पारधी समाजाच्या मुलांना थेट झिडकारले जाते़ मात्र, या पारधी मुलांना आता राजपत्रित अधिकारी, उद्योगपती, बडे नेते आणि कलावंतांचा मायेचा स्नेह मिळणार आहे़ श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे वसतीगृहातील आदिवासी जमातीतील ३० चिमुकल्या मुला-मुलींना सहलीचा आनंद मिळावा, यासाठी अनेकांचे हात सरसावले आहेत़ या मुलांना १ ते ३ जून दरम्यान पुणे शहरातील ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडविले जाणार आहे. पुण्यात विविध ठिकाणी भेटी देणार असून, या सहलीदरम्यान राजपत्रित अधिकारी, उद्योगपती, बडे नेते कलावंतांच्या निवासस्थानी या मुलांना स्नेह मिळणार आहे़ उन्हाळ्याची सुटी लागली की पुढारलेल्या वर्गातील मुलं-मुली आपले नातेवाईकांकडे जातात अथवा मुलांसाठी फॅमिली टूरचे आयोजन केले जाते. यामध्ये मुले उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटतात. मात्र, पिढ्यान्पिढ्या परागंदा जीवन जगणार्‍या गुन्हेगारीचा डाग पडणार्‍या पारधी जमातीतील मुला-मुलींना कसली सहल आणि कसला स्नेह! त्यामुळेच एस.एस.सी. पुणे बोर्डाचे विभागीय सचिव अनिल गुंजाळ यांनी श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे वसतीगृहातील मुला-मुलींसाठी पुणे शहर दर्शन सहलीची अनोखी संकल्पना मांडली. आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासह विविध क्षेत्रात समाजीक जाणीवेतून काम करणार्‍या बड्या व्यक्तींनी दोन-दोन मुलांची आपल्या निवासस्थानी राहण्याची सोय केली आहे. ही बडी माणसं या मुलांना कौटुंबीक प्रेम, जिव्हाळा, ओलावा देणार आहेत. तीन दिवसाच्या सहलीत मुलांना शनिवारवाडा, राजीव गांधी उद्यान, विश्रामवाडा, सिंहगड, बंड गार्डन, लेझर शो आदी ठिकाणे तसेच सिटी प्राईड सिनेमागृहात चित्रपट दाखविण्यात येणार आहे. श्रीगोंद्यातील पारधी जमातीतील मुला-मुलींना पुणेकरांचा स्नेह, प्रेम मिळणार आहे. यामधून जीवनात उर्मी येणार आहे. पारध्याच्या पालातील अंधारमय जीवनाला स्नेहाचा प्रकाश मिळाला आणि या प्रकाशाची किरण दूरवर पोहचू लागली आहे. (प्रतिनिधी) भावना मानवतावादी श्रीगोंद्यात अनंत झेंडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पारधी समाजातील मुलांच्या जीवनात आधार, संस्कार, शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्य बदलण्याची मुहूर्तमेढ रोवली. मानवतेच्या भावनेतून पुणे दर्शन आणि दिग्गजांचा स्नेह ही संकल्पना मांडली आणि यासाठी पुणेकरांचे स्नेहाचे हात पुढे आले.