गोंडेगाव जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST2021-07-16T04:15:33+5:302021-07-16T04:15:33+5:30

भेंडा : नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले. गटशिक्षण अधिकारी सुलोचना पटारे, शालेय ...

Tree planting in Gondegaon Zilla Parishad school | गोंडेगाव जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

गोंडेगाव जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

भेंडा : नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले. गटशिक्षण अधिकारी सुलोचना पटारे, शालेय पोषण आहार अधीक्षक हेमलता गलांडे, विस्ताराधिकारी शिवाजी कराड, रेणुका चन्ना, केंद्रप्रमुख मीरा केदार यांच्या प्रेरणेने वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. शाळेत कडुलिंब, वड, करंजी, चिंच, गुलमोहर, पिंपळ यांची झाडे लावली. मुख्याध्यापक रामचंद्र गजभार यांनी शाळेस अत्यावश्यक असलेल्या साहित्याची मागणी केली. तसेच सेतू अभ्यासक्रम, ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण याविषयी माहिती दिली. उपसरपंच संतराम रोडगे, कामगार तलाठी विजय जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर शिरसाठ, व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापूसाहेब रोडगे, ग्रामसेवक अशोक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अमोल गारुडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रोपे ग्रामपंचायतीने दिली. शिक्षक भास्कर तांबे, त्रिंबक गोरे यांनी आभार मानले.

Web Title: Tree planting in Gondegaon Zilla Parishad school