वाळकीच्या न्यू इंग्लिश स्कूलची दहावीच्या निकालाची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:20+5:302021-07-24T04:14:20+5:30

वाळकी : वाळकी (ता. नगर ) येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल वाळकी विद्यालयाने दहावीच्या निकालाची उज्ज्वल आणि ...

The tradition of X results in the New English School of Valaki continues | वाळकीच्या न्यू इंग्लिश स्कूलची दहावीच्या निकालाची परंपरा कायम

वाळकीच्या न्यू इंग्लिश स्कूलची दहावीच्या निकालाची परंपरा कायम

वाळकी : वाळकी (ता. नगर ) येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल वाळकी विद्यालयाने दहावीच्या निकालाची उज्ज्वल आणि गौरवशाली परंपरा यंदाही कायम ठेवली आहे.

विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयातून परीक्षेत प्रविष्ट झालेल्या १५९ विद्यार्थ्यांपैकी ८२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. ७३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. ४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

श्रेया नंदकुमार येणारे (प्रथम ९५ टक्के), साक्षी शिवाजी लोखंडे (द्वितीय ९४ टक्के), ऋतुजा दिलीप धोत्रे (९३.८० टक्के, तृतीय) यांनी उल्लेखनीय यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य बाळासाहेब बोठे, स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, सरपंच स्वाती बोठे, उपसरपंच दादा कासार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, प्राचार्य एस. जी. शिंदे, पर्यवेक्षक सुनील कोठुळे, काकासाहेब देशमुख, कैलास खणकर, भगवान मते, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काैतुक केले.

---

तीन पासपोर्ट फोटो

२३श्रेया येणारे, साक्षी लोखंडे, ऋतुजा धोत्रे

Web Title: The tradition of X results in the New English School of Valaki continues