शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

आज होणार पलंग-पालखी भेट

By admin | Updated: September 27, 2014 00:15 IST

भिंगार : हजारो वर्षांची परंपरा लाभलेला पलंग-पालखी भेट सोहळा शनिवारी (दि़२७) बुऱ्हाणनगर येथे रंगणार आहे़

भिंगार : हजारो वर्षांची परंपरा लाभलेला पलंग-पालखी भेट सोहळा शनिवारी (दि़२७) बुऱ्हाणनगर येथे रंगणार आहे़ हा सोहळा अनुभवण्यासाठी राज्यभरातील भाविक बुऱ्हाणनगरला येतात़महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे बुऱ्हाणनगर हे माहेर तर तुळजापूर हे सासर मानले जाते़ नवरात्र उत्सव काळात तुळजापुरात दसऱ्याच्या दिवशी देवीच्या मूर्तीला नगरहून आणलेल्या पालखीतून सीमोल्लंघन केले जाते़ तर पलंगावर पाच दिवस निद्रीस्त अवस्थेत ठेवले जाते़ हा पलंग जुन्नर येथे गणेशोत्सवातील अष्टमीपर्यंत पलंग बनविला जातो़ पूर्वी हिंगणगाव (ता़नगर) येथे दरवर्षी नवीन पालखी तयार केली जात होती़ मात्र, आता ही पालखी राहुरीमध्ये बनविली जात आहे़ पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखीसाठी लागणारे साहित्य बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी माता मंदिराचे पुजारी अर्जुन भगत पुरवितात़ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पालखी राहुरीतून तर पलंग जुन्नरहून नगरकडे मार्गस्थ होतात़ ही पालखी राहुरी, पारनेर व नगर तालुका फिरुन घटस्थापनेला हिंगणगावात येते़ नंतर दुसऱ्या दिवशी नगर, भिंगार कँप व तिसऱ्या माळेला बुऱ्हाणनगर येथे यात्रेनिमित्त दुपारी १२ वाजेपासून ते सायंकाळी ५ पर्यंत पालखीची मिरवणूक काढली जाते़ मिरवणुकीनंतर ही पालखी हनुमान मंदिराच्या ओट्यावर विसावते़ दरम्यान त्याचवेळेस पलंगही तेथे पोहोचतो़ यावेळी हळदी कुंकू वाहून गुलालाची उधळण करीत तुळजाभवानी मातेचा जयजयकार केला जातो़ पूजा-आरती झाल्यानंतर पलंग व पालखी वेगवेगळ्या मागार्ने तुळजापूरकडे रवाना होतात़ पलंग-पालखी भेट सोहळा अनुभवण्यासाठी राज्यभरातून भाविक बुऱ्हाणनगरला येतात़ (वार्ताहर)