शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिषांकडे चकरा, बोटात अंगठ्या अन् हातात गंडे-दोरे; आमदारकीसाठी इच्छुकांची तयारी

By अरुण वाघमोडे | Updated: October 22, 2024 13:02 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी सारेच समजून घेताहेत ग्रहमान

अरुण वाघमोडे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर: विधानसभा निवडणूक जाहीर होताच इच्छुक उमेदवारांच्या ज्योतिषांकडील चकरा वाढल्या आहेत. राजयोग आहे का?, ग्रहदशा कशी आहे, काही अडचण असेल तर त्यावर उपाय काय? आदी शंकांचे निरसन इच्छुक ज्योतिषांकडून करून घेत आहेत. ज्योतिषांकडूनही इच्छुकांना पूजाअर्चा, होमहवन, अनुष्ठान, पेहरावातील बदल, रत्न परिधान करणे आदी उपाय सांगितले जात आहेत.  

अर्ज भरण्यासाठी मुहूर्त कोणता?

पक्षाची उमेदवारी मिळेल का, मिळाली तर जनमत आपल्या बाजूने असेल का, निवडून येण्याची शक्यता किती राहील, यासह अर्ज भरण्याचा शुभमुहूर्त कोणता, त्यावेळी कोणता पोशाख परिधान करावयाचा, कार्यालयात कोणत्या देवाचे फोटो लावायचे, जनसंपर्क कार्यालयाचे द्वार कोणत्या दिशेने असावे आदींबाबत ज्योतिषांकडून इच्छुकांना मार्गदर्शन केले जात आहे. 

देवांना नवस, हातात गंडे-दोरे

एखादे काम सिद्धीस जावे, यासाठी देवाला नवस करण्याची जुनी परंपरा आहे. निवडणुकीच्या काळात बहुतांश उमेदवार देवस्थानाच्या ठिकाणी जाऊन नवस बोलतात, दानधर्म करतात, तसेच बोटात अंगठ्या, वेगवेगळी रत्ने घालतात. हातात धागे आणि गळ्यात विशिष्ट चिन्ह असलेले लॉकेट घालताना दिसतात. 

विरोधकांच्या कुंडलीचीही चाचपणी

काही नेते ज्योतिषांकडून स्वत:ची कुंडली शुद्ध करून घेताना प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कुंडलीचीही चाचपणी करतात. त्यानुसार मग पुढील राजकीय डावपेच ठरविले जातात. 

निवडणूक काळात काही नेत्यांचा ज्योतिषशास्त्रानुसार भविष्य समजून घेण्याचा कल असतो. कुंडली चुकीची असली तर भविष्यही चुकते. कुंडलीत ३, ६, ११ घरे राजयोगाने प्रबळ असावी लागतात. लग्नेश व भाग्यही प्रबळ असावे लागते.
- प्रा. जवाहर मुथा, ज्योतिष अभ्यासक

शक्तिपीठ महामार्गास विरोध; १२ जिल्ह्यांतील ७२ उमेदवार पाडणार

कोल्हापूर: शक्तिपीठ महामार्ग रद्द न करणाऱ्या महायुतीचे १२ जिल्ह्यांतील ७२ उमेदवार पराभूत करण्याचा निर्धार कोल्हापुरात सोमवारी झालेल्या राज्यव्यापी निर्धार परिषदेत शेतकऱ्यांनी ठरावाद्वारे केला.  यावेळी शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्ग विरोधात लढण्याची शपथ घेतली.

कोल्हापुरात शाहू स्मारक भवन येथे खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. खासदार शाहू छत्रपती म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत, परंतु सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही. आता राजकीय परिवर्तन झाल्याखेरीज शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ahilyanagarअहिल्यानगर