शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

प्रवरेतून जायकवाडीकडे झेपावले एक टीएमसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

पाचेगाव : भंडारदरा आणि मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात गत दहा दिवसापासून झालेल्या पावसामुळे प्रवरा नदी वाहती झाली. १ जुलैपासून ते ...

पाचेगाव : भंडारदरा आणि मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात गत दहा दिवसापासून झालेल्या पावसामुळे प्रवरा नदी वाहती झाली. १ जुलैपासून ते २१ जुलैपर्यंत प्रवरेतून एक टीएमसीपेक्षा अधिक पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे.

गतवर्षीप्रमाणेच यंदाही वरुणराजाने लाभक्षेत्रावर मेहेरबानी दाखविली. सरासरीपेक्षा अधिक पाऊस लाभक्षेत्रात नोंदला गेला. यंदा जुलैच्या सुरुवातीलाच प्रवरा वाहती झाली. नेवासा येथील मध्यमेश्वर बंधाऱ्यावरील जलमापकावर दि. २१ जुलै रोजी नोंदविलेल्या आकडेवारीनुसार तब्बल ११४९ दलघफू पाणी जायकवाडीत सामावले आहे. गतवर्षी संपूर्ण मोसमात प्रवरेतून जायकवाडीसाठी तब्बल ४५ टीएमसी वाहिले होते. प्रवरेतून जायकवाडीच्या दिशेने सध्या ४५६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून, लाभक्षेत्रात अधिक पाऊस झाल्यास नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

बुधवारी सकाळच्या आकडेवारीनुसार मुळा धरणात ४० टक्के, भंडारदरा धरणात ५० टक्के, तर निळवंडे धरणात १९ टक्के पाणीसाठा झालेला होता. वरील धरणाच्या पाणलोटातही गत तीन-चार दिवसापासून पावसाचे धूमशान सुरू असून, तीनही धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे ही धरणे लवकरात लवकर भरावीत, अशी अपेक्षा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची आहे.