तीन हजार आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदानाचा झाला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST2021-04-09T04:21:28+5:302021-04-09T04:21:28+5:30

दोन हजार रुपयांची रक्कम याच महिन्यात पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर सरकारकडून अनुदान प्राप्त होताच दुसऱ्या टप्प्याचे ...

Three thousand tribal families benefited from the khawati grant | तीन हजार आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदानाचा झाला लाभ

तीन हजार आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदानाचा झाला लाभ

दोन हजार रुपयांची रक्कम याच महिन्यात पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर सरकारकडून अनुदान प्राप्त होताच दुसऱ्या टप्प्याचे अनुदान दिले जाईल, असे आमदार कानडे यांनी सांगितले.

कानडे म्हणाले, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील खावटी अनुदानाचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबांना व्हावा यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांची संयुक्त बैठक घेऊन आदिवासी विभागाचे सर्वेक्षण अधिकारी यांना सहकार्य करण्याबाबत व आपल्या गावातील जास्तीत जास्त पात्र आदिवासी बांधवांना लाभ मिळावा म्हणून नियोजन करण्यात आले होते. त्याचाच परिणाम म्हणून ही कुटुंबे खावटी अनुदान योजनेसाठी पात्र ठरली आहेत. हा निधी विनाविलंब आदिवासी बांधवांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा व्हावा यासाठी गुरुवारी राजूर आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे.

Web Title: Three thousand tribal families benefited from the khawati grant