दुधाच्या टँकरला ट्रॅव्हलची धडक; तिघांचा मृत्यू, 7 गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 13:39 IST2019-02-23T08:33:09+5:302019-02-23T13:39:35+5:30
औरंगाबाद - नगर महामार्गावरील कांगोणी फाट्याजवळ शनिवारी पहाटे दुधाच्या टँकरला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हलने पाठीमागून जोरदारची धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे.

दुधाच्या टँकरला ट्रॅव्हलची धडक; तिघांचा मृत्यू, 7 गंभीर जखमी
सोनई - औरंगाबाद - नगर महामार्गावरील कांगोणी फाट्याजवळ शनिवारी पहाटे दुधाच्या टँकरला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हलने पाठीमागून जोरदारची धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून ट्रॅव्हलमधील सात प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. एकूण 19 जण जखमी झाले आहे,
अपघातातील जखमींना उपचारासाठी अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून उर्वरित किरकोळ जखमींना नेवासा येथे उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ललीत पांडुळे यांनी घटनास्थळी दाखल होऊन तातडीने जखमींना रूग्णालयात दाखल केले. घटनास्थळी सोनई पोलीस व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. मृत्यू झालेल्यांची ओळख न पटल्यामुळे त्यांची नावे कळू शकलेली नाही.