सत्तर हजार भाविकांनी पाळले मौन

By Admin | Updated: January 31, 2016 23:30 IST2016-01-31T23:23:06+5:302016-01-31T23:30:56+5:30

अहमदनगर : मेहेर टेकडीवर मेहेरबाबांच्या जयघोषाने प्रफुल्लीत झालेले वातावरण़़़ भजन, भक्तीगितांत तल्लीन झालेले भाविक़़़ ११ वाजून ४५ मिनिटांनी बिगिन दि बिगिन ही धून वाजली

Thousands of devotees observed silence | सत्तर हजार भाविकांनी पाळले मौन

सत्तर हजार भाविकांनी पाळले मौन

अहमदनगर : मेहेर टेकडीवर मेहेरबाबांच्या जयघोषाने प्रफुल्लीत झालेले वातावरण़़़ भजन, भक्तीगितांत तल्लीन झालेले भाविक़़़ ११ वाजून ४५ मिनिटांनी बिगिन दि बिगिन ही धून वाजली त्यानंतर मेहेरधून म्हणण्यात आली़ घड्याळात बाराचा ठोका पडताच मेहेर टेकडीवरील सत्तर हजार मेहेरप्रेमींनी मौनव्रत धारण केले़ जल्लोषपूर्ण वातावरणाचे १५ मिनिटे शांततेत रुपांतर झाले़ १२ वाजून १५ मिनिटांनी ‘मेहेरबाबा की जय’ चा जयघोष करत भाविकांनी मौन सोडले़
आरणगाव रोडवरील मेहेराबाद येथे रविवारी अवतार मेहेरबाबांच्या अमरतिथी सोहळ्यातील मौनव्रत सोहळा पार पडला़ यावेळी देश-विदेशातील सत्तर हजार भाविक उपस्थित होते़ ३१ जानेवारीला बाबांनी देहत्याग केला होता़ तेव्हापासून अमरतिथी सोहळ्यात या दिवशी भाविक १५ मिनिटांचे मौन पाळतात़ या सोहळ्यासाठी भाविक आवर्जून येतात़
रविवारी मौनव्रताआधी ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर केळकर यांनी मेहेरबाबांबद्दल माहिती सांगितली़ रविवारी सकाळी बाबांनी सुरू केलेल्या धुनीजवळ हजारो भाविक उपस्थित होते़ सकाळी ६ वाजता भजनास सुरुवात झाली, नंतर मेहेरधून म्हटली गेली व सूर्योदयास धुनी पेटविण्यात आली. त्यामध्ये भाविकांनी आपल्यातील दुर्गुणाचे प्रतीक म्हणून लाकडाची काडी टाकली व दर्शन घेतले़
सकाळी ८ वाजता मुख्य मंडपात कार्यक्रम सुरू झाले़ दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती़ जगातील ७० देश व भारतातून सुमारे लाखांच्यावर मेहेरप्रेमी आले आहेत, परदेशातील ४०० भाविक आले आहेत़
(प्रतिनिधी)
अमरतिथी सोहळ्यात विदेशातून आलेल्या भाविकांच्यावतीने मेहेराबाद येथे गेल्या दोन दिवसांपासून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे़ शनिवारी रात्री भजन, गजल, नृत्य, कव्वाली, गाणे, नाटिका सादर करत उपस्थितांची मने जिंकली़ मेहेराबाद येथे जाण्यासाठी नगर शहरातील तीनही बसस्थानकातून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे़ मेहेराबाद येथे रेल्वेचा थांबाही सुरू करण्यात आल्याने भाविकांची अडचण दूर झाली़

Web Title: Thousands of devotees observed silence