शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

जल आराखड्यावरील सूचनांना मुदतवाढ नाही

By admin | Updated: September 22, 2015 00:24 IST

अहमदनगर : जलसंपदा विभागाने मुळा व प्रवरा खोऱ्यातील पाण्याचा जल आराखडा तयार करून तो संकेतस्थळावर प्रसिध्द केला होता

अहमदनगर : जलसंपदा विभागाने मुळा व प्रवरा खोऱ्यातील पाण्याचा जल आराखडा तयार करून तो संकेतस्थळावर प्रसिध्द केला होता. त्यावर सूचना, अभिप्राय नोंदविण्यासाठी १७ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत वाढविण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. प्रत्यक्षात राज्य सरकार पातळीवरून त्यास मुदतवाढ मिळालेली नाही. दरम्यान, महिनाभरात या जल आराखड्यावर जिल्ह्यातून ७०७ सूचना, अभिप्राय नोंदविण्यात आले असल्याची माहिती गोदावरी खोरे महामंडळाकडून देण्यात आली.मुळा-प्रवरा उप खोऱ्यातील जवळपास ४०.५० टीएमसी पाणी काढून जायकवाडीला देण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातला आहे. गोदावरी खोऱ्यात ३० उपखोरी आहेत. यात जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी, मुळा आणि प्रवरा खोऱ्यांचा समावेश आहे. या खोऱ्यातील अतिरिक्त राहणारे पाणी काढून ते मराठवाड्याला देण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाचा आहे. वास्तवात काहींच्या म्हणण्यानुसार गोदावरी खोरे हे तुटीचे, तर जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार गोदावरी खोरे हे साधारण खोरे आहे. जल आराखडा तयार करताना ज्या खोऱ्यात अतिरिक्त पाणी आहे, ते त्या ठिकाणाहून दुसऱ्या खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. यासाठी जल आराखडा तयार करण्यात आलेला आहे. दुसरीकडे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार गोदावरी खोरे हे सर्वसाधारण खोरे असताना त्यातील पाणी मराठवाड्याला दिल्यास नगर जिल्ह्यातील शेती, औद्योगिकीकरण आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. असे असताना जलसंपदा विभागाने मुळा व प्रवरा खोऱ्यातील पाण्याचा जल आराखडा तयार करून तो सूचना आणि हरकतींसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेला आहे. यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे. मराठवाड्याला पाणी देण्यास जिल्ह्यातून तीव्र विरोध होत आहे. यासाठी पाणी बचाव समितीही स्थापन करण्यात आलेली आहे. १७ तारखेपर्यंत जल आराखड्यावर सूचना नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ७०७ अभिप्राय, सूचना नोंदविण्यात आलेल्या आहे. १७ तारखेला गणेश चतुर्थी असल्याने १८ तारखेपर्यंत सूचना घेण्यात आलेल्या आहेत. (प्रतिनिधी)