शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

जामखेड-करमाळा मार्गावर सायंकाळी साडेपाचनंतर बसच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST

जवळा : जामखेड-करमाळा मार्गावर सायंकाळी साडेपाचनंतर एकही बस नसल्याने या मार्गावर असलेल्या गावांमधील प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे या ...

जवळा : जामखेड-करमाळा मार्गावर सायंकाळी साडेपाचनंतर एकही बस नसल्याने या मार्गावर असलेल्या गावांमधील प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे या मार्गावर पुन्हा पूर्वीप्रमाणे बस सुरू कराव्यात, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

जामखेड-करमाळा रस्त्यावर तालुक्यातील जवळा, नान्नज, चुंबळी, पाडळी, झिक्री, धोंडपारगाव, बोर्ले या गावांबरोबरच करमाळा तालुक्यातील आळजापूर, बिटरगाव, पोथरे ही गावेही येतात. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी एसटी बस सेवा खंडित झाल्यानंतर करमाळा मार्गावरील दुपारी साडेपाचनंतर एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यात जामखेड आगाराने दुर्लक्ष केले आहे.

जामखेड आगारातून दुपारी साडेपाच वाजता करमाळा आगाराची शेवटची बस या मार्गावरून जाते. यानंतर मात्र जवळा, नान्नज, करमाळा या ठिकाणी जाण्यासाठी एकही बस नसल्याने प्रवाशांची खूपच गैरसोय होत आहे.

जामखेड आगाराची पावणेसात वाजताची करमाळा मुक्कामी व साडेआठ वाजताची जवळा मुक्कामी या दोन बस गेली चाळीस वर्षांहूनही अधिक काळ नियमित सुरू आहे. या दोन्ही बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद होता. मात्र, कोरोनाचे कारण देत या बस गेल्या तीन महिन्यांपासून विनासूचना बंद करण्याचा प्रकार घडला आहे. सध्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने चालविण्यास मुभा असताना बस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

जामखेड आगाराची जवळा ते नगर ही जवळा मुक्काम असलेली बसही बंद झाल्याने जवळा, हळगाव, पिंपरखेड, अरणगावहून नगरला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली.

----

उत्पन्नाअभावी जामखेड डेपोच्या अनेक गाड्या बंद आहेत. मात्र, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी करमाळा व जवळा मुक्कामी बस सुरू करण्यात येतील.

- महादेव शिरसाठ,

आगारप्रमुख, जामखेड

-----

करमाळा व जवळा मुक्कामी बस पुन्हा नियमित सुरू करण्याबाबत सूचना करणार आहे.

-विजय गिते

विभाग नियंत्रक,

राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नगर