शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

..तर जुन्या पद्धतीने द्यावी लागतात तिकिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST

संगमनेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून पूर्वी प्रवास करताना प्रवाशांना वाहक तिकिटे देताना तिकिटांना विशिष्ट पद्धतीने छिद्र ...

संगमनेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून पूर्वी प्रवास करताना प्रवाशांना वाहक तिकिटे देताना तिकिटांना विशिष्ट पद्धतीने छिद्र पाडून द्यायचे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे प्रवाशांना तिकिटे द्यायला सुरुवात झाली. मात्र, इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन काही कारणाने बंद पडल्यास वाहकांना पूर्वी सारखीच खटखट करत जुन्या पद्धतीने तिकिटे द्यावी लागतात.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन करण्यात आला होता. दुसऱ्या लाटेत ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून निर्बंध घालून दिले होते. त्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर झाला. याला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळदेखील अपवाद नव्हते. कोरोना काळात महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. नाशिक-पुणे दोन महानगरांना जोडणारा रस्ता संगमनेर तालुक्यातून जात असल्याने संगमनेर बसस्थानकात प्रवाशांची नेहमीच मोठी वर्दळ असायची. कोरोना येण्याआधी संगमनेर आगाराचे महिन्याचे उत्पन्न साधारण दीड कोटीपर्यंत होते. या आगारात एकूण ५३ बसेस असून त्यात दोन शिवशाही तर दोन सेमी लक्झरी बसेस आहेत. सहा मालवाहतूक ट्रक आहेत.

बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटे देण्यासाठी संगमनेर आगारात १२६ इलेक्ट्रॉनिक मशीन उपलब्ध आहेत. त्यापैकी एकही मशिन बंद नसून सर्व मशीन सुस्थितीत असल्याचे आगारप्रमुख निलेश करंजकर यांनी सांगितले. मशीन चार्ज करण्यासाठी स्थानकात विशिष्ट सोय करण्यात आली आहे. वाहकांना दिल्या गेलेल्या मशीनमध्ये काही बिघाड झाल्यास ते दुरुस्त करण्यासाठी मशीन पुरविलेल्या कंपनीची व्यक्ती पूर्णवेळ उपलब्ध असते. मशीन बिघडल्यास पर्यायी मशीन वाहकांना देण्यात येते. प्रवासात कधी मशीन बिघडल्यास वाहक प्रवाशांना पूर्वी दिली जाणारी तिकिटे देतात. ती तिकिटे कायमस्वरूपी बसमध्ये असतात, असेही करंजकर यांनी सांगितले.

---------------

कोरोनामुळे उत्पन्न घटले

२०१९ साली संगमनेर आगारात ७६ बसेस होत्या. सध्या आगारात ५३ बसेस आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने शालेय तसेच ग्रामीण भागातील बहुतांशी फेऱ्या या बंद आहेत. मध्यम, लांब पल्ल्याच्या बसेस सुरू आहेत. कोरोनामुळे उत्पन्न घटून ते निम्म्यावर आले आहे. दररोज तीन लाख रुपये उत्पन्न सध्या मिळत असल्याचे आगारप्रमुख निलेश करंजकर यांनी सांगितले.

-----------

जुळवाजुळव करण्यात वेळ जातो

प्रवाशांना तिकिटे देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मशीन आल्याने वाहकांचे काम सोपे झाले. इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये एका बटनावर रिपोर्ट मिळतो. मात्र, प्रवासादरम्यान या मशीनमध्ये बिघाड झाल्यास वाहकांना जुन्या पद्धतीने प्रवाशांना तिकिटे द्यावी लागतात. त्यामुळे आकड्यांची जुळवाजुळव करण्यात काही वेळ जातो.

-------------

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सेवेत असलेले अधिकारी, कर्मचारी, वाहक-चालक यांचे पगाराचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहेत. दर महिन्याच्या सात तारखेला पगार होतो. मात्र, सध्या पगार हे थोडे उशिराने का होईना, परंतु पूर्ण मिळत आहेत.

-निलेश करंजकर, आगारप्रमुख, संगमनेर