Bhondu Baba Ashok Kharat Nashik: अशोक खरातविरोधात आणखी एक प्रकरण समोर आले. चार वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेत अशोक खरातही आरोपी होता. शिर्डी येथील एका ३७ वर्षीय तरुणाने चार वर्षापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कौटुंबिक वाद आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या जाचाला कंटाळून त्याने आयुष्य संपवले होते. याच प्रकरणात अशोक खरातचाही समावेश होता.
या आत्महत्या प्रकरणात शिर्डीपोलिसांनी मृताचे सासरे, मेहुणा आणि भोंदू खरातसह चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, पोलिसांना पुरेसे पुरावे न मिळाल्याने खरातचे नाव पुढे दोषारोपपत्रातून वगळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
विकास रामदास दिवटे (वय ३७, रा. शिर्डी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ राजेंद्र दिवटे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
विकास दिवटे आत्महत्या प्रकरण नेमके काय?
पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या माहितीनुसार, विकास दिवटे हे साई संस्थानमध्ये नोकरीला होते. त्यांचे पत्नीसोबत घरगुती कारणावरून वाद सुरू होते. त्यावरूनच विकासचे सासरे, मेहुणा आणि साडू हे त्यांना सातत्याने मानसिक त्रास देत होते.
विकास यांना त्यांच्या पत्नी व मुलाशी बोलू दिले जात नव्हते, तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे, या वादात मिरगाव (ता. सिन्नर) येथील भोंदूबाबा अशोक खरात याचाही सहभाग असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
अशोक खरातचा या आत्महत्या प्रकरणाशी संबंध कसा?
विकास यांना या भोंदूबाबा अशोक खरातकडे नेण्यात आले होते. या अशोख खरातनेही विकास यांना वारंवार त्रास देऊन जिवे मारण्याची आणि साई संस्थानातील नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. सततच्या धमक्या, मानसिक त्रास आणि बदनामीच्या भीतीने विकास दिवटे यांनी ९ जून २०२२ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती.
एसआयटीच्या चौकशीसाठी नोटिसा
राज्यभर गाजत असलेल्या खरातप्रकरणी शिर्डीतील काही प्रतिष्ठित व्यक्तींकडे पोलीस चौकशी करणार आहेत. शिर्डीतील काही प्रमुख व्यक्तींना विशेष तपास पथकाकडून नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे.
दरम्यान, शिर्डीतील शेतकरी फसवणूक प्रकरणात खरातच्या पत्नीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणातील व्यवहाराच्या वेळी असलेले साक्षीदार व अन्य सहभाग असलेल्या व्यक्तींचे पोलिसांनी जबाब नोंदवले.
Web Summary : Ashok Kharat, accused in a 2022 suicide case, had his name dropped from the chargesheet due to lack of evidence. The victim, harassed by family and Kharat, died by suicide. Police are investigating Kharat's wider fraud cases.
Web Summary : अशोक खरात, 2022 के आत्महत्या मामले में आरोपी थे, लेकिन सबूतों के अभाव में आरोप पत्र से उनका नाम हटा दिया गया। पीड़ित, परिवार और खरात से प्रताड़ित होकर आत्महत्या कर लिया। पुलिस खरात के व्यापक धोखाधड़ी मामलों की जांच कर रही है।