शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे संकट दूर कर, सर्वांना आरोग्य दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST

गुरुवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने शुक्रवारी सकाळी मुस्लीम बांधवांनी एक महिन्याच्या निर्जळी उपवासाची सांगता करत ईद साजरी केली. कोरोना संसर्गाचा ...

गुरुवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने शुक्रवारी सकाळी मुस्लीम बांधवांनी एक महिन्याच्या निर्जळी उपवासाची सांगता करत ईद साजरी केली. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन एकत्र न जमता तसेच एकमेकांना आलिंगन देण्याऐवजी फोनवर संपर्क साधून व संदेश पाठवून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

शहरातील इदगाह मैदानावर यंदा सामूहिक नमाज अदा झाली नाही तसेच मशिदीमध्येही भाविक गेले नाहीत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कुठेही गर्दी न करता घरीच ईद साजरी करावी, असे प्रशासनाने आवाहन केले होते. नगर शहरात मुस्लीम बांधवांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. महिनाभराच्या निर्जळी उपवासाची सांगता करणारा ईद हा मुस्लीम धर्मामध्ये मोठा सण आहे. ईदच्या दिवशी नगर शहरात मोठे उत्साहपूर्ण वातावरणात असते अनेक ठिकाणी ईद-ए-मिलादचे कार्यक्रम होतात. गेल्या दोन वर्षापासून मात्र कोरोनाच्या सावटामुळे घरी थांबूनच हा सण साजरा करावा लागत आहे.

...........

सोशल मीडियावरून शुभेच्छा संदेश

यंदा रमजान ईद व अक्षय्य तृतीया एकाच दिवशी आले. लॉकडाऊन आणि कोरोना संसर्गामुळे एकमेकांना भेटणे शक्य नसल्याने नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ईद व अक्षय्य तृतीयाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, ईदच्या दिवशी शहरात गजबजणाऱ्या खाऊ गल्ल्या व बाजारपेठांत यंदा शुकशुकाट होता.

...........

घरोघरी दरवळला शीरखुर्माचा सुगंध

ईदनिमित्त यंदा एकत्र स्नेहमिलन, इफ्तार पार्टी व इतर सार्वजनिक कार्यक्रम झाले नसले तरी मुस्लीम बांधवांनी घरी नेहमीप्रमाणे शीरखुर्मा, गुलगुले व इतर पंचपक्वान बनवून उत्साहात ईद साजरी केली. कोरोनाच्या सावटामुळे सलग दुसऱ्या वर्षी मुस्लीम बांधवांनी घरीच थांबून ईद साजरी केली.