शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांच्या निलंबनाला स्थगिती

By admin | Updated: December 16, 2015 23:07 IST

अहमदनगर : पक्षादेश डावलून महापौरपदाच्या निवडणुकीत मतदान केल्यामुळे निलंबित केलेल्या मनसेच्या तीन नगरसेवकांचे निलंबन स्थगित करण्यात आले

अहमदनगर : पक्षादेश डावलून महापौरपदाच्या निवडणुकीत मतदान केल्यामुळे निलंबित केलेल्या मनसेच्या तीन नगरसेवकांचे निलंबन स्थगित करण्यात आले असून शहर कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्तीचा निर्णय पक्षाचे नेते शिरीष सावंत यांनी घेतला. तसे लेखी आदेशही त्यांनी दिले. किशोर डागवाले यांनी मनसेतून सेनेत प्रवेश करताच पक्षाने तिघांचे निलंबन स्थगीत करून त्यांची मनधरणी केली. याशिवाय शहर प्रमुखपदाची जबाबदारी नगरसेवक गणेश भोसले यांच्यावर टाकण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. महापौर पदाच्या निवडणुकीत सेनेचे उमेदवार सचिन जाधव यांना मतदान करण्याचा पक्षादेश मनसेच्या प्रदेशनेत्यांनी बजावला होता. मात्र हा पक्षादेश डावलून पक्षाच्या किशोर डागवाले, गणेश भोसले, वीणा बोज्जा, सुवर्णा जाधव यांनी आघाडीचे अभिषेक कळमकर यांना मतदान केले. कळमकर महापौर पदाच्या निवडणुकीत विजयी झाले. मात्र पक्षादेश डावलला म्हणून पक्षाने चारही नगरसेवकांना सहा वर्षासाठी निलंबित केले होते. किशोर डागवाले यांनी गत आठवड्यात मनसेतून सेनेत प्रवेश केला. त्यानंतर अन्य तिघेही सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. पक्षाचे मुंबईतील नेते अविनाश अभ्यंकर यांनी तिन्ही नगरसेवकांशी संपर्क साधून त्यांची बुधवारी पुणे येथे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी भेट घडवून आणली. स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले, नगरसेविका वीणा बोज्जा यांचे पती श्रीनिवास बोज्जा, नगरसेविका सुवर्णा जाधव यांचे पती दत्ता जाधव, नगरसेवक कैलास गिरवले, गजेंद्र राशीनकर, सानप यांनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. नगर शहरातील पक्षाची स्थिती त्यांनी ठाकरे यांच्यासमोर मांडली. त्यानंतर ठाकरे यांच्या आदेशान्वये शहर कार्यकारिणी बरखास्त करत तिघा नगरसेवकांचे निलंबन स्थगीत करण्यात आले. शहरप्रमुख पदाची जबाबदारी गणेश भोसले यांच्यावर सोपविण्यात येणार असून त्यांच्याशी चर्चा करूनच नवीन शहर कार्यकारिणी जाहीर केली जाईल, असाही निर्णय झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पुढील दोन वर्षात पक्ष संघटना बळकट करण्याची जबाबदारी भोसले यांच्यावर टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)