उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनाच निलंबित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:24 IST2021-08-13T04:24:57+5:302021-08-13T04:24:57+5:30

इंदोरी फाटा, विरगाव फाटा व इतरत्र ज्या हॉटेलात अवैध दारू विकली जाते त्यांचे परवाने रद्द करावे व सतत दारू ...

Suspend excise officers only | उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनाच निलंबित करा

उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनाच निलंबित करा

इंदोरी फाटा, विरगाव फाटा व इतरत्र ज्या हॉटेलात अवैध दारू विकली जाते त्यांचे परवाने रद्द करावे व सतत दारू विकणारे तडीपार करावेत, अशी मागणीही केली आहे. गेली अनेक वर्षे दारूबंदी आंदोलन तालुक्यातील अवैध दारूविषयी तक्रारी करूनही दारू थांबत नाही. उत्पादन शुल्क अधिकारी व अवैध दारू विक्रेते यांच्या संबंधांचे अनेक तपशील लोक सांगतात. ज्यांनी दारू रोखायची तेच दारू विक्रीला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे आता दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी आहे. संगमनेर येथील दुकानातून रोज अनेक गाड्या तालुक्यातील लिंगदेव, लहित, राजुर, शाहूनगर, इंदोरीफाटा, वीरगावफाटा या ठिकाणी दारू पोहोचवत आहेत. कोतुळ विभागात तर पुणे जिल्हा, घारगाववरून गावोगावी दारू विकली जात आहे. अकोले नदी पुलाजवळ खिशात बाटल्या ठेवून व्यवसाय होतो आहे. पोलिसांवर ही जबाबदारी आहेच. पण उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांचे प्रथम कर्तव्य आहे. अनेकदा निवेदने तक्रारी करूनही दारू थांबवणे दूरच, परंतु अनेक दारूवाल्यांना दारू विकण्याला प्रोत्साहन देण्याची उदाहरणे घडली आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Suspend excise officers only