शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे पुन्हा होणार सर्वेक्षण

By admin | Updated: December 17, 2015 23:39 IST

अहमदनगर : जानेवारी महिन्यात पुन्हा शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे.

अहमदनगर : जानेवारी महिन्यात पुन्हा शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. मंगळवारी जिल्हास्तरावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यासह एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, प्रत्येक शाळाबाह्याला शाळेत दाखल करण्याचे आदेश माध्यमिकचे शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांनी दिले. जुलै २०१५ ला शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण झाल्यानंतर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडे सर्वेक्षणात त्रुटी राहिल्या असल्याच्या तक्रारी स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिक्षण विभागाने पुन्हा शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी प्रत्येक जिल्हा पातळीवर शाळाबाह्य विषयात काम करणारे व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, माध्यमिक शिक्षण विभागाने समिती स्थापन करून त्याव्दारे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधमोहिमेसाठी बैठक झाली. यावेळी शिक्षणाधिकारी पोले, उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी राजेंद्र काळे, तांबे उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम तालुकास्तरावरून गटशिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून ऊस तोडणीे, वीटभट्टी, खडी क्रशर कामगारांच्या वस्त्यांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच साखर कारखाने परिसरात कारखाना व्यवस्थापनाच्या मदतीने शाळाबाह्यांना त्याच ठिकाणी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)