शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाऐवजी साखरेला अनुदान देणे गरजेचे

By admin | Updated: December 24, 2015 23:35 IST

संगमनेर : साखर कारखानदारी सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे अडचणीत सापडली आहे.

संगमनेर : साखर कारखानदारी सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे अडचणीत सापडली आहे. ३ हजार ५०० रुपये उसाला भाव मिळाल्याशिवाय एफआरपीप्रमाणे भाव देणे शक्य नाही. त्यामुळे कारखान्यांना बिनव्याजी कर्जाऐवजी साखरेला अनुदान देण्याची मागणी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली. रविवारी खराडी येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर होते. व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँक अध्यक्ष सीताराम गायकर, उपाध्यक्ष रामदास वाघ, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, अ‍ॅड. माधव कानवडे, शिवाजी थोरात, रणजीत देशमुख, शंकर खेमनर, रावसाहेब नवले आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले, सहकार हा गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहे. निकोप सहकारामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळाली आहे. खराडी हे विकासाच्या पाठिशी उभे राहणारे गाव आहे. निवडून आल्यावर गळ्यात पडणारे हार हे जनतेच्या अपेक्षांचे असतात. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगून सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये बहुमताने विजयी केल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. गायकर यांनी थोरातांमुळे जिल्हा बँकेत काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगत यापुढे दूध व्यवसायाला बँक मदत करणार असल्याचे स्पष्ट केले. खेमनर, तांबे, देशमुख, कानवडे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक वाघ यांनी केले. कार्यक्रमास भाऊसाहेब कुटे, लक्ष्मण कुटे, लहानुभाऊ गुंजाळ, मीनाक्षी थोरात, पूनम माळी, रोहिणी गुंजाळ, अण्णा राहिंज, अ‍ॅड. नानासाहेब गुंजाळ, रावसाहेब वर्पे, अ‍ॅड. मधुकर गुंजाळ, गणपत सांगळे, अशोक खेमनर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश गुंजाळ यांनी करून नाना वाघ यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)