शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

‘तनपुरे’च्या कामगारांचा कुटुंबासह रास्ता रोको

By admin | Updated: September 19, 2014 23:39 IST

राहुरी : येथील तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांनी कुटुंबासह रास्तारोको आंदोलन करून आपल्या व्यथांना वाट मोकळी करून दिली़

राहुरी : ४१ महिन्यांचा पगार थकल्याने सहनशीलतेचा अंत झालेल्या राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांनी कुटुंबासह जम्बो रास्तारोको आंदोलन करून आपल्या व्यथांना वाट मोकळी करून दिली़ राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर नगर-मनमाड राज्यमार्गावर झालेल्या आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ संचालक मंडळावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी घेण्यात आली असून पुढील कार्यवाही केली जाईल व कामगारांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही साखर सहाय्यक आयुक्त कार्यालयातील लेबर आॅफिसर तळेकर यांनी दिल्यानंतर रास्तारोको आंदोलनावर पडदा पडला़कारखान्याच्या गेटसमोर जमलेले कामगार कुटुंबातील सदस्यासह रस्त्यावर घोषणा देत आले़ आमचे पगार मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली़ कामगारांच्यावतीने तहसीलदार राजश्री आहिरराव यांना संगीता गोल्हार, सविता कराळे, सुनीता राऊत, दुधाळे यांनी निवेदन दिले़ कामगारांच्या मागण्या न्याय असून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही तहसीलदार अहिरराव यांनी दिली़ कारखान्याच्या जंगम मालमत्तेची विक्री करून कामगारांचे पगार केले जातील़ जिल्हाधिकाऱ्यांकडून यासंदर्भात पाठपुरावा केला जाईल़, असे त्यांनी सांगितले. सुरेश थोरात म्हणाले, कारखान्याची सर्वसाधारण सभा होत असून संचालक मंडळाने कामगार हिताचा विचार करावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल़ अर्जुन दुशिंग यांनी कारखाना सुरळीत चालावा म्हणून कामगारांनी आटोकाट प्रयत्न केला आहे़ कामगारांचे पगार द्या अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा दिला़यावेळी अशोक नगरे,भारत पेरणे,भाऊसाहेब पगारे, संजीव भोर,चंद्रकांत कराळे, सविता कराळे, सोमनाथ वाकडे, प्रभाकर तारडे, निखील कराळे, दत्तात्रय कोहकडे यांची भाषणे झाली़ (तालुका प्रतिनिधी)