भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या वतीने उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा विखे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यात नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, किसान मोर्चाचे प्रभारी जालिंदर वाकचौरे, जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे, उपाध्यक्ष ॲड. रघुनाथ बोठे, अशोक पवार, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस नंदकुमार जेजूरकर, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, सभापती भाऊसाहेब जेजूरकर, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, बाळासाहेब डांगे, युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश बावके, उपसभापती ओमेश जपे, बाळासाहेब जपे, जिल्हा परिषद सदस्या कविता लहारे, संगमनेर शहर अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले उपस्थित होते.
विखे म्हणाले, राज्य सरकार मात्र कोविड संकटाच्या नावाखाली हात बांधून बसले आहे. केवळ लॉकडाऊनचे निर्णय करून, या सरकारने जनतेला त्रस्त केले. कवडीचीही मदत हे सरकार करू शकले नाही. राज्यात लसीकरण झाले तेसुध्दा प्रधानमंत्र्यांनी मोफत लस उपलब्ध करून दिल्यामुळेच. तुम्ही राज्यातील शेतकऱ्यांना काय दिले? आघाडी सरकारच्या मंत्र्यांचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी किसान मोर्चाला आता पार पाडावी लागणार आहे. आघाडी सरकारचे अपयश लोकांमध्ये जाऊन तुम्हाला सांगावे लागेल. एकीकडे तीन पक्षांचा आवाज आहे, तर दुसरीकडे भाजप म्हणून आपला आवाज लोकांमध्ये जाऊन मजबूत करावा लागेल. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन द्या.
180821\e-1-800x445.jpg
भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या पदाधिका-यांना नियुक्ती पत्र प्रदान समारंभ