शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेस प्रारंभ

By admin | Updated: January 14, 2016 23:00 IST

अहमदनगर : जिल्हा हॉकी असोसिएशन, अहमदनगर महानगरपालिका, जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेला गुरुवारी प्रारंभ झाला़

अहमदनगर : जिल्हा हॉकी असोसिएशन, अहमदनगर महानगरपालिका, जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेला गुरुवारी प्रारंभ झाला़ या स्पर्धेतून रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे़पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, अकोला, जालना, उस्मानाबाद, अमरावती, नाशिक, धुळे, नंदुरबार, बीड, लातूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नांदेड, क्रीडा प्रबोधीनी अशा २२ संघातील ४४० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत़ आदेश शिंदे या खेळाडूने स्पर्धकांना शपथ दिली़ विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी आ़ संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, माजी आमदार प्रसाद तनपुरे, दादाभाऊ कळमकर, शंकरराव घुले, रंगनाथ डागवाले, महापालिकेचे उपायुक्त भालचंद्र बेहरे आदी उपस्थित होते़ स्पर्धेतील प्रदर्शनीय सामना नगर व नाशिक यांच्यामध्ये झाला़ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी दुपारी होणार आहे़ ५० पंच व तांत्रिक अधिकारी, हॉकी संघटनेचे ५० पदाधिकारी, ५० स्वयंसेवक या स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहेत़ खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था संघटनेच्यावतीने करण्यात आली असून, शुक्रवारी सकाळी आठ वाजता स्पर्धेतील पहिला सामना बीड व नाशिक या संघांदरम्यान होणार आहे़ दिवसभरात अकरा सामने होणार असून, यातील विजेत्यांची लढत शनिवारी होणार आहे़ (प्रतिनिधी)विखे यांच्या कानपिचक्याक्रीडा संकुलाची दुरवस्था संपून खेळाकडे मुलांचे आकर्षण वाढेल, खेळाडू मैदानात येतील, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे़ राज्य सरकार व जिल्हा नियोजन समितीकडून खेळासाठी व मैदानांसाठी निधी मिळणे आवश्यक आहे़ क्रीडा संघटनांमधील वाद संपले पाहिजेत़ क्रीडा संघटनेचे पदाधिकारी वादातून वेळ मिळाल्यानंतरच खेळाकडे लक्ष देतात, अशा कानपिचक्या विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी दिल्या़ तसेच क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी राज्य, राष्ट्रीय स्तरावरील नामांकित खेळाडूंना निमंत्रित करायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला़