शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यवर्धक रानभाज्यांची आवक सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:26 IST

अकोले : सलग दोन वर्षे कोरोना सावटामुळे पावसाळ्यातील रानभाज्या बाजारात दाखल झाल्या नाहीत. मात्र सध्या आरोग्यवर्धक कोळू व तांदूसा ...

अकोले : सलग दोन वर्षे कोरोना सावटामुळे पावसाळ्यातील रानभाज्या बाजारात दाखल झाल्या नाहीत. मात्र सध्या आरोग्यवर्धक कोळू व तांदूसा (तांदूळचा) या भाज्या शहरात विक्रीसाठी येत असून बाजारतळाच्या, रस्त्याच्या कडेला बसून आदिवासी ही भाजी विकत आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात मानवी आरोग्य हितकार असलेल्या शिंदळमाकड, कोळू, बडदा, चाई, करटोली, तांदूसा या भाज्या विक्रीसाठी येत असत. या भाज्या घेण्यासाठी गर्दी होताना दिसत असे. सध्या फक्त कोळू व तांदूसा या भाज्या बाजारात दिसत आहेत.

आदिवासी रानात डोंगरदरीत फिरुन या रानभाज्या गोळा करतात आणि बाजारात विक्रीसाठी आणतात. ठराविक काळातच या भाज्या मिळतात. या भाज्यांची माहिती असणारे नागरिक रानभाजी खरेदीसाठी गर्दी करतात. शिंदळमाकड व काटेरी करटुले या रानभाज्या कारल्यासारख्या चवीला कडू असल्या तरी पित्तनाशक आहेत.

या भाज्या खाल्ल्याने पित्तामुळे होणारी जळजळ, करपट ढेकर आदी विकार कमी होऊन पचनशक्ती वाढते. रानभाज्याच्या सेवनामुळे पोटाचे विकार दूर होतात. आदिवासी काटक, निरोगी असण्याचे रानभाज्या हेच रहस्य आहे. रानभाज्या विक्रीतून आदिवासींना आर्थिक उत्पादन मिळते. मात्र, कोरोनामुळे हे उत्पन्न ठप्प झाले होते. आता यावर्षी किरकोळ प्रमाणात आदिवासींचे हे उत्पन्न सुरु झाले आहे.

चाईची भाजी दाट जंगलात मिळते. शिंदळमाकड आवर्षण परिसरातील टेकड्यांच्या पोटाला खडक माळरानावर वाढतात. ‘कॅक्टस’ कांडी ही सांबर सारखी असते. पानथळ जागी कोळू आढळून येते. कांद्याच्या पातीसारखी ही भाजी असून लोक आवडीने विकत घेतात. ‘करटुले’ ही कारल्यासारखी कडू भाजी असली तरी हाडे मजबूत होण्यास मदत होते. सराटेची भाजी कंबर दुखीवर गुणकारी असते.

तालुक्यातील निसर्गात भटकताना म्हैसवेल, हादगा, चंदनबटवा, आंबटवेल, भोकर, सुरण, कुरडु, काटेमाठ, हिरवा व लालमाठ, आंबाडी, गुळवेल, चाई बोंडे, भूई-आवळी, बांबूचा कोंब, रानओवा, आंबटचुका, फांदभाजी, रानतोंडली, कोंदुरसा, तांदुळसा, कडू शेरणी, कडू वाळूक अशा आरोग्यवर्धक भाज्या मिळून येतात.

............

प्रचाराची गरज

रानभाज्यांचे महत्व आणि त्या तयार करण्याची रेसिपी याचा अधिक प्रचार झाल्यास आरोग्यवर्धक पिढी होण्यास मदत होईल आणि आदिवासींना आर्थिक उत्पादनाचा श्रोत उपलब्ध होईल. वनविभागाने या रानभाज्याच्या माहितेचे फलक लावून या रानभाज्यांचा प्रचार केला पाहिजे, अशी मागणी होत आहे.

.........

०५ अकोले रानभाज्या

सोमवारी अकोले बाजारतळासमोर कळस खुर्द येथील आदिवासी महिलेने कोळू भाजी विकायला आणली होती.