सिन्नरमध्ये एसटी आणि कारचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 13:17 IST2019-01-26T13:03:37+5:302019-01-26T13:17:30+5:30
शिर्डी महार्गावर एसटी आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पांगरी शिवारात बाबा ढाब्याजवळ हा अपघात घडला.

सिन्नरमध्ये एसटी आणि कारचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू
ठळक मुद्देशिर्डी महार्गावर एसटी आणि कारचा भीषण अपघातचार जणांचा जागीच मृत्यूअपघातात कारचा चेंदामेंदा
कोपरगाव : शिर्डी महार्गावर एसटी आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पांगरी शिवारात बाबा ढाब्याजवळील ही घटना आहे. शुक्रवारी (25 जानेवारी) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर एसटी बसने अचानक पेटदेखील घेतला.
नाशिकच्या दिशेने जाणारी परळ बस पांगरी शिवारात आल्यानंतर शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सोनू चिने (वय ३० वर्ष), आकाश पाटील(वय २६ वर्ष), पंकज वाळूंज (वय २८ वर्ष), सौरभ थोरात(वय ३० वर्ष) या चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.