शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ५६ मि़ मी़ पाऊस

By admin | Updated: July 11, 2014 00:56 IST

अहमदनगर: गेल्या एक महिन्यापासून पावसाने ताण दिला होता़ जून पूर्णपणे कोरडा गेला़ त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईने डोके वर काढले आहे़ सोसाट्याचा वारा वाहू लागल्याने सर्वांनाच देव आठवू लागले होते़

अहमदनगर: गेल्या एक महिन्यापासून पावसाने ताण दिला होता़ जून पूर्णपणे कोरडा गेला़ त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईने डोके वर काढले आहे़ सोसाट्याचा वारा वाहू लागल्याने सर्वांनाच देव आठवू लागले होते़ सामान्यांसह सरकारी यंत्रणाही धास्तावली होती़ मात्र उशिरा का होईना, पण नगर शहरासह जिल्ह्यात हलक्या सरींनी पावसाचे आगमन झाले असून, बुधवारी जिल्ह्यात सरासरी ४ मि़ मी़ पावसाची नोंद झाली आहे़
सर्वसाधारणपणे नगर जिल्ह्यात ७ जूनला मान्सूनचा पाऊस पडतो़ मान्सून वेळवरच बरसणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता़ मात्र हवामान खात्याचे अंदाज मोडीत काढत जूनमध्ये मान्सून पडलाच नाही़ जून कोरडा गेल्याने चिंता वाढली़ जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पावसाचा पत्ता नव्हता़ परिणामी धरणांत नवीन पाणी आलेच नाही़ जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा व भंडारदरा धरणाने तळ गाठला आहे़ धरणांत नवीन पाण्याची आवक होईल, असा पाऊस झाला नाही़ त्यामुळे धरणांची स्थिती जैसे थे आहे़ परंतु गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, पावसाचे धिम्या गतीने आगमन झाले़ उशिरा का होईना, पण पावसाला सुरुवात झाली आहे़
पावसाची झड सुरू असून, जिल्ह्यात सरासरी ४़ ३० मि़ मी़ पाऊस झाला आहे़ त्यात सर्वाधिक पावसाची नोंद नेवासा तालुक्यात झाली आहे़
शहरात दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली़ आकाशात काळे ढग दाटून आले़ दुपारनंतर झालेल्या पावसाने सखल भागात पाणी साचले होते़ राहुरी तालुक्यातही हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला़ तर श्रीगोंदा तालुक्यात ९ मि़ मी़ पाऊस पडला आहे़ इतर ठिकाणीही रिमझिम पाऊस पडला़
जोराचा नसला तरी भिज पाऊस सर्वत्र पडत आहे़ आणखी पाऊस होईल, या अपेक्षेने पेरणीची लगबग सुरू झाली आहे़ भिज पाऊस झाल्याने उत्तर नगर जिल्ह्यात कपाशीच्या लागवडीला सुरुवात झाली असून, बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे़ मात्र जोरदार पावसाची अजूनही बळीराजाला प्रतीक्षा आहे़ (प्रतिनिधी)