शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कपाटाचा दर्जा ठरणार महत्वाचा पुरावा

By admin | Updated: June 25, 2016 00:38 IST

अहमदनगर : अंगणवाडी सेविकांमार्फत खरेदी करण्यात आलेल्या निकृष्ट कपाट खरेदी प्रकरणात सध्या ‘तेरी चूप, मेरी चूप’असे सुरू आहे.

अहमदनगर : अंगणवाडी सेविकांमार्फत खरेदी करण्यात आलेल्या निकृष्ट कपाट खरेदी प्रकरणात सध्या ‘तेरी चूप, मेरी चूप’असे सुरू आहे. महिला बालकल्याण विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी कपाट खरेदीबाबत कानावर हात ठेवले असून अंगणवाडी सेविका दबावापोटी गप्प आहेत. आता खरेदी करण्यात आलेल्या कपाटाचा दर्जा महत्वाचा पुरावा ठरणार असल्याने प्रशासनाने खरेदी करण्यात आलेल्या कपाटाचा दर्जा तपासणीची मागणी होत आहे. महिला बालकल्याण विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी महिला बालकल्याण आयुक्त कार्यालयाने अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर निधी वर्ग करून किरकोळ दुरूस्ती आणि कपाट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जिल्ह्यातील ३ हजार ६०३ अंगणवाडीमधील सेविकांच्या खात्यावर प्रत्येकी ५ हजार प्रमाणे १ कोटी ८० लाखांचा निधी वर्ग करण्यात आला. मात्र, जिल्ह्यात अनेक तालुक्यात नेमक्या याच संधीचा फायदा महिला बालकल्याण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आणि अंगणवाडी सेविका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला दिसत आहे.अनेक तालुक्यात अंगणवाडी सेविकांच्या माथी निकृष्ट प्रतीचे कपाट मारण्यात आले आहे. अंगणवाडी सेविकांकडे पुरवठादार यांच्यामार्फत कपाट पोहोचविण्यात आले असून त्यांच्याकडे थेट निधीची मागणी करण्यात आलेली आहे. नगर तालुक्यात पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात वितरीत झालेल्या कपाटाचा दर्जा तपासण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अंगणवाडी सेविका आणि महिला बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांच्या चुप्पी मुळे जि.प. प्रशासन अडखळले होते. मात्र, या प्रकरणात कपाटाचा दर्जा महत्वाचा पुरावा ठरणार आहे. कपाटाचा दर्जा खरेदीच्या आदेशानुसार नसल्यास एक तर अंगणवाडी सेविकेने निकृष्ट कपाट खरेदी केले अथवा अधिकाऱ्यांनी दबाब आणून त्यांना खरेदी करण्यास भाग पाडले यातून एक कारण पुढे येणार आहे. यामुळे कपाटाचा दर्जा या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरणार आहे. (प्रतिनिधी)