श्रीरामपूर भाजपचे ५६ दिवस अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:15 IST2021-06-17T04:15:37+5:302021-06-17T04:15:37+5:30

अभियानामध्ये अजित बाबेल, गणेश बिंगले, रवि पंडित यांनी जबाबदारी स्वीकारली होती. अलका रवि बिहाणी, वीणा राजेंद्र उपाध्ये, मोती महाराज ...

Shrirampur BJP's 56 days food donation | श्रीरामपूर भाजपचे ५६ दिवस अन्नदान

श्रीरामपूर भाजपचे ५६ दिवस अन्नदान

अभियानामध्ये अजित बाबेल, गणेश बिंगले, रवि पंडित यांनी जबाबदारी स्वीकारली होती. अलका रवि बिहाणी, वीणा राजेंद्र उपाध्ये, मोती महाराज गौड आदींनी स्वादिष्ट भोजन बनवून दिले. स्टेट बॅंक परिसर, श्रीराममंदिर परिसर, व्यापारी मंगल कार्यालय, बसस्थानक, रेल्वेस्थानक, गांधी पुतळा, हनुमान मंदिर परिसरातील गरजूंना भाजी, पोळी, मसाले भात, शिरा असे जेवण दिले.

अन्नछत्र अभियानात मदत करणारे बेलापूर येथील भरत साळुंके, रवि खटोड, सुवालाल लुंकड, शरद नवले, रणजीत श्रीगोड, सुनील मुथ्था, अभिषेक खंडागळे, पुरुषोत्तम भराटे, अभिजित राका, भेर्डापूरचे बाळासाहेब धनवटे, कारेगावचे प्रणव भारत, सुनील पटारे, टाकळीभानचे डॉ. भालेराव, नारायण काळे, नवाज शेख यांना प्रशस्तिपत्रक देण्यात आले.

अभियानात श्रीराज डेरे, सुनील वाणी, बबन मुठे, गणेश राठी, विठ्ठल राऊत, मारुती बिंगले, सतीश सौदागर, बंडूकुमार शिंदे, प्रफुल्ल डावरे, अनिल भनगडे, राम तरस, मिलिंद साळवे आदींनी परिश्रम घेतले.

----------

Web Title: Shrirampur BJP's 56 days food donation