शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मरगळलेल्या भाजपाला शहा पॅटर्नची संजीवनी

By admin | Updated: July 30, 2014 00:45 IST

अहमदनगर : देशामध्ये भाजपाची सत्ता आली तरी नगर जिल्ह्यातील भाजपा अजूनही मरगळलेल्या अवस्थेत आहे.

अहमदनगर : देशामध्ये भाजपाची सत्ता आली तरी नगर जिल्ह्यातील भाजपा अजूनही मरगळलेल्या अवस्थेत आहे. मात्र या मरगळलेल्या पक्षाला अमित शहा पॅटर्न संजीवनी देणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन, उत्तम व्यवस्थापन करण्याचे आदेश प्रदेश समितीकडून पक्षाला मिळाले आहेत. त्यामुळे पक्षातील नेते, कार्यकर्ते कामाला लागले असून एक आॅगस्टपासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.गेल्या आठवड्यात प्रदेश समितीच्या दोन-तीन बैठका झाल्या. त्यामध्ये जिल्ह्यातील पक्ष मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि कमकुमत जागा यासाठी प्रचार नियोजन, संपर्क व्यवस्थापन, कार्यकर्ता निर्माण आदींवर भर देण्यात येणार आहे.विधानसभा प्रमुख आणि निवडणूक व्यवस्थापन समिती गठीत केली जाणार आहे. या दोन्हीसाठीची नावे जिल्हा समिती अंतिम करणार आहे. ही नावे प्रदेशाध्यक्षांकडून घोषित केली जाणार आहेत. संघटन मंत्री राजेंद्र फडके यांच्या नेतृत्त्वाखाली नियोजन होणार आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना अन्य जिल्ह्यात विस्तारक म्हणून प्रचार करता येणार आहे. निवडणुकीच्या कालावधीसाठी पूर्णवेळ निवडणूक सहायक नियुक्त करणार आहे. (प्रतिनिधी)आगरकरांकडेच जिल्ह्याची जबाबदारीलोकसभा निवडणुकीप्रमाणे जिल्ह्यातील भाजपाचे पक्षाचे नेतृत्त्व नगरचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांच्याकडेच राहण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बांधणी करण्याचे आदेश प्रदेशने आगरकर यांनाच दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण जिल्ह्याचे संघटनात्मक व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी आगरकर यांच्यावरच सोपविण्यात आली आहे. त्यामुळे नवा जिल्हाध्यक्ष मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. दोन निरीक्षकांची नियुक्तीविधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात दोन पक्ष निरीक्षकांची प्रदेश समितीने नियुक्ती केली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार माधुरी मिसाळ (पुणे) यांची जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा ५आॅगस्टपासून जिल्हा दौरा सुरू होणार आहे. भाजपाच्या मतदारसंघात जाऊन ते प्रत्यक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच प्रदेश पदाधिकारी म्हणून योगेश गोगावले यांची प्रदेश समितीने नगर जिल्ह्यासाठी नियुक्ती केली आहे. शंभर टक्के बुथरचना करण्यासाठी ते नियोजन करणार आहेत. दोन मतदारसंघ कठीणनगर जिल्ह्यातील भाजपाच्या वाट्याला आलेले पाथर्डी-शेवगाव आणि नेवासा या दोन विधानसभा मतदारसंघाची कठीण मतदार संघाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. तेथील जागा भाजपाला मिळवून देण्यासाठी प्रदेशकडून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आमदार पंकजा पालवे-मुंडे यांच्याकडे पाथर्डी-शेवगाव, तर विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांच्यावर नेवासा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांना ‘विधानसभा पालक’असे संबोधण्यात आले आहे.