शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यात जिल्ह्यात २७ जण जाळ््यात

By admin | Updated: July 29, 2014 01:03 IST

अहमदनगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ््यात जानेवारी २०१४ पासून म्हणजे अवघ्या सात महिन्यांमध्ये जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी लाचेच्या जाळ््यात अडकले आहे.

अहमदनगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ््यात जानेवारी २०१४ पासून म्हणजे अवघ्या सात महिन्यांमध्ये जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी लाचेच्या जाळ््यात अडकले आहे. एक-दोन दिवस पोलीस कोठडीची हवा खाऊन ते सही-सलामत बाहेर आले आहेत. त्यांचा तपास प्रलंबित असल्याने त्यांच्यावर अद्याप दोषारोपपत्रही दाखल झालेले नाही. २७ पैकी फक्त दोनच अधिकाऱ्यांवर दोषारोप पत्र दाखल झाले आहे. दरम्यान लाचखोरांपैकी फक्त एकाच अधिकाऱ्याची मालमत्ता हस्तगत केली आहे. त्याच्याकडे नऊ कोटीची माया सापडली होती. अन्य अधिकाऱ्यांच्या मालमत्तांची चौकशी मात्र वाऱ्यावरच गेली आहे. एक हजार रुपयांपासून ते चार लाख रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तलाठी, मंडलाधिकारी, अभियंता, महसूल विभागातील अधिकारी, पोलीस यांचा समावेश आहे. पारनेर येथील एका न्यायाधीशाचाही लाचेच्या यादीत नंबर लागल्याने न्यायव्यवस्थेबाबतही सामान्यांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)यांचा तपास प्रलंबित (२०१४)जया पनाड (तलाठी,अकोले), सुनील फापाळे (महसूल, शिर्डी), संजय रासने (मंडलाधिकारी, राहाता), अनिल गरुड (महसूल, कोपरगाव), प्रवीण कुलकर्णी (न्यायालय, पारनेर), विभावरी गायकवाड (विकास महामंडळ, नगर), अंकुश बोडखे (पोलीस, नेवासा), विश्वनाथ दहे (मनपा, नगर), विश्वास यादव (अभियंता, शेवगाव), रोहिदास शेलार (पोलीस, घारगाव), बाळकृष्ण वराट (जि.प.नगर), संभाजी गर्जे (पोलीस, शेवगाव), साहेबराव बेळगे (जि.प.नगर),सोन्याबापू मांडगे, चांगदेव आंधळे (पोलीस, नगर), अविनाश दाभाडे (मंडलाधिकारी, रुईछत्तीसी), चंद्रकांत नागवडे (नायब तहसीलदार, नगर), अण्णासाहेब सोनवणे (पोलीस, पाथर्डी), उमेश कावळे (अन्न-औषध,नगर), अर्जुन पठाडे (जि.प. पाटबंधारे, शेवगाव), प्रभू हाडबे (प्रदूषण नियंत्रण,नगर), दिलीप निऱ्हाळी (दुय्यम निबंधक), लक्ष्मीकांत पाटील, पांडुरंग बांगर (राजूर), शीतलकुमार साबळे (संगमनेर), सुभाष भारती (संगमनेर), अप्पासाहेब ढेरे (मंडलाधिकारी, घोडेगाव).एक प्रकरण वगळता हस्तगत मालमत्ता शून्यलाच स्वीकारताना रक्कम मिळून आल्यानंतर संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्या घरावर धाडी टाकल्या जातात. त्यांच्याकडील मालमत्ता सील केली जाते. तसेच चौकशी केली जाते. मात्र एखादी-दुसरी सोडली तर सर्वच घटनांमध्ये कोणतीही अन्य मालमत्ता तपासली गेली नसल्याचे अहवालांवरूनच स्पष्ट झाले आहे. मनपाचे नगररचनाकार विश्वनाथ दहे यांच्या मालमत्तेची चौकशी झाली होती. त्यामध्ये ९ कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आली होती. तशी चौकशी अन्य कोणत्याही लाचखोर अधिकाऱ्यांची झाली नसल्याने लाच स्वीकारण्यामध्ये आता अधिकाऱ्यांना भीती वाटत नाही.