सरपंच जनतेतूनच निवडला जावा, अन्यथा...; सरपंच परिषदेचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 15:33 IST2020-01-29T15:31:55+5:302020-01-29T15:33:25+5:30

ग्रामपंचायतीच्या सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा कायदा मागील सरकारने केला होता, परंतु या सरकारने तो कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sarpanch should be chosen from the people, otherwise ...; Warning of Sarpanch Council to uddhav thackrey | सरपंच जनतेतूनच निवडला जावा, अन्यथा...; सरपंच परिषदेचा सरकारला इशारा

सरपंच जनतेतूनच निवडला जावा, अन्यथा...; सरपंच परिषदेचा सरकारला इशारा

ठळक मुद्देआज परिषदेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पुन्हा सरकार मधील लोकांना भेटणार असून विनंती करणार आहोत.

शेवगाव : ग्रामपंचायतीच्या सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा कायदा मागील सरकारने केला होता, परंतु या सरकारने तो कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 'सरपंच जनतेतूनच निवडला जावा' अशी महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेची मागणी आहे. त्यामुळे सरकार रद्द करत असलेल्या निर्णयाला सरपंच संघटनेने विरोध केला आहे. 


सरकार ने हा निर्णय रद्द करू नये यासाठी सरपंच परिषदेने आंदोलन सुरू केले असून आज शेवगाव (जि. नगर ) येथे आज परिषदेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.


आम्ही राजकारण करत नाही; पण सरकारला नवे नेतृत्व तयार होऊ द्यायचे नाही काय? सरकार जर आमच्यासोबत जाणीवपूर्वक हीनतेने वागत असेल तर सरकारला आपापल्या गावात योग्य जागा दाखवून देऊ. आम्ही पुन्हा सरकार मधील लोकांना भेटणार असून विनंती करणार आहोत. मात्र, तरीही सरकार निर्णयावर ठाम राहिले तर प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात मोर्चे काढू, असा इशारा सरपंच परिषदचे राज्य अध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिला आहे. 

Web Title: Sarpanch should be chosen from the people, otherwise ...; Warning of Sarpanch Council to uddhav thackrey