शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच ते मुख्यमंत्री सर्व लोकनियुक्त असावेत - आण्णा हजारे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 20:54 IST

'थेट जनतेतून सरपंच निवडला जावा हेच महत्त्वाचे आहे. '

राळेगण : गावचा सरपंच नव्हे तर राज्याचा मुखमंत्री सुद्धा जनतेने निवडून दिला पाहिजे, तीच खरी लोकशाही म्हणता येईल. खेड्यांचा विकास पक्ष आणि गटामुळेच खुंटला आहे. घटनेप्रमाणे समुदायाला निवडणूक लढवता येत नाही. ती व्यक्तीनेच लढवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. 

थेट जनतेतून सरपंच निवडला जावा हेच महत्त्वाचे आहे. जर तो निवडला जात नसेल तर यासंबंधाने राज्यभर आंदोलन उभे होणे गरजेचे आहे. लोकशाही लोकांची आहे. लोकांच्या लोकसहभागातूनच ती चालली पाहिजे, असेही ही अण्णा हजारे म्हणाले. राज्य शासनाने लोकनियुक्त सरपंच पद रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गीते पाटील आणि  सरपंच पदाधिकाऱ्यांनी आज आण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. त्याप्रसंगी आण्णा यांनी वरील संदेश दिला आण्णा हजारे यांनी सध्या मौनव्रत धारण केले आहे. त्यामुळे  कागदावर लिहून त्यांनी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. 

याप्रसंगी अण्णांच्या चालू असलेले मौनास  सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. तसेच राज्य शासनाने जनतेतून लोकनियुक्त सरपंच रद्द बाबत घेतलेला निर्णय राज्यातील सरपंचांना मान्य नसून याबाबत अण्णांचे  लक्ष  वेधले. राज्य शासनाच्या निर्णयाबाबत अण्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरपंच पदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत सर्व पदाची निवड जनतेतून निवड व्हावी, राज्य शासनाने जनतेचा हा अधिकार हिसकावू घेऊ नये. खेड्यांचा विकास गटतट आणि पक्षीय  राजकारणामुळे थांबलेला आहे. राज्यातील सरपंच व जनतेने याबाबत तीव्र स्वरूपाचा विरोध करावा. राज्यातील सरपंचांनी तसे ठराव करावेत व राज्य शासनाला पाठवावेत, असे सांगितले. 

याचबरोबर, प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी सरपंच परिषदेच्या माध्यमातून या असणाऱ्या शासनाच्या निर्णयाला प्रचंड विरोध करणार असल्याचे सांगितले. राज्यातील जनतेने याबाबत सरपंच परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा त्यांनी केले. यावेळी महिला प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी थोरात, प्रदेश सदस्य नारायण वनवे, आबासाहेब सोनवणे ,अरुण ठाणगे, स्वाती नऱ्हे व सरपंच उपस्थित होते.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे