संगमनेर (जि. अहिल्यानगर): संगमनेर येथील शिवसेनेचे आमदार अमोल खताळ हे संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमास गेले होते. यावेळी संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील एका तरुणाने हात मिळवण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला. मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले आहे. रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.
अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्याची बातमी संगमनेरमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर खताळ समर्थक आक्रमक झाले. आमदार समर्थकांचा प्रचंड मोठा समूह संगमनेर पोलीस ठाण्याच्या परिसरात जमा झाला आहे. सध्या संगमनेर मध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यातील संघर्षामुळे संगमनेरची चर्चा राज्यात होत असताना गुरुवारी संगमनेरमध्ये ही घटना घडली.