वाळू माफियास सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2016 01:23 IST2016-06-24T00:49:49+5:302016-06-24T01:23:56+5:30

कोपरगाव : वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू माफियास एक महिना सक्तमजुरी व पाचशे रूपये दंडाची शिक्षा कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए़ बी़ शेंडगे यांनी सुनावली़

Sand Mafias Empowerment Education | वाळू माफियास सक्तमजुरीची शिक्षा

वाळू माफियास सक्तमजुरीची शिक्षा


कोपरगाव : वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू माफियास एक महिना सक्तमजुरी व पाचशे रूपये दंडाची शिक्षा कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए़ बी़ शेंडगे यांनी सुनावली़
कोपरगाव तहसील कार्यालयाच्या पथकाने १७ जून २०११ रोजी डाऊच खुर्द येथे एमएच १५ सीके ६८६० क्रमांकाचा चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला़ याबाबत ट्रकचालक जालिंदर रामनाथ शिरसाठ (रा़ मुसळगाव, ता़ सिन्नर) याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना भररी पथकाने मागितला, तो त्याच्याजवळ नव्हता़ त्यानंतर पथकाने जालिंदर शिरसाठ विरूद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला़ सदर दाव्यात सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले़ त्यावरून गुन्हा सिद्ध झाला़ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए़ बी़ शेंडगे यांनी आरोपीस एक महिना सक्तमजुरीची शिक्षा व ५०० रूपये दंड ठोठावला़ सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता बी़ डी़ भोईटे यांनी काम पाहिले़ (प्रतिनिधी)

Web Title: Sand Mafias Empowerment Education