बंधारे दुरुस्तीसाठी पस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST2021-07-16T04:15:38+5:302021-07-16T04:15:38+5:30

मानोरी येथील बंधारा दुरुस्तीसाठी सुमारे २५ लाख २५ हजार, तर डिग्रस येथील बंधाऱ्यात नऊ लाख ५५ हजार रुपये खर्चास ...

Rs 35 lakh sanctioned for dam repair | बंधारे दुरुस्तीसाठी पस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर

बंधारे दुरुस्तीसाठी पस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर

मानोरी येथील बंधारा दुरुस्तीसाठी सुमारे २५ लाख २५ हजार, तर डिग्रस येथील बंधाऱ्यात नऊ लाख ५५ हजार रुपये खर्चास मान्यता मिळालेली आहे. मुळा नदी पात्रात डिग्रस, मानोरी, मांजरी, वांजुळपोई अशी बंधाऱ्यांची मालिका आहे. हे सर्व बंधारे मोठ्या प्रयत्नाने उभारण्यात आले. यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा मोठा उपयोग होतो. मध्यंतरी अतिवृष्टी व अधिकच्या पाण्यामुळे बंधारे नादुरुस्त झालेले होते. दुरुस्तीसाठी निधी मिळणे अत्यंत गरजेचे होते. १९९९ सालापासून बंधारे बांधण्यात आलेले होते. या सर्व बंधाऱ्यांत जवळपास एक हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा जमा होतो. पुनर्भरण व वापर यामुळे दोन टीएमसी पाण्याचे गणित होते. मानोरी बंधाऱ्याची पाणीसाठवण क्षमता १२५ दशलक्ष घनफूट असून, या बंधाऱ्यामुळे केंदळ खुर्द, मानोरी, आरडगाव, केंदळ बुद्रुक या गावांतील सुमारे दोन हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येते. सुमारे ५२ हजार क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग नदीतून जात होता. बंधाऱ्याच्या दोन्ही तीरावरील भराव व पीचिंग वाहून गेले होते. त्यामुळे धोका निर्माण झाला होता. बंधारे दुरुस्ती करण्यासाठी लागणारा निधी त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्याने कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: Rs 35 lakh sanctioned for dam repair