शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

फेज-२ मुळे रखडले रस्त्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST

अहमदनगर : रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेताना गटार व जलवाहिनीच्या कामाचे नियोजन केले जाते. मात्र, शहरातील रस्त्यांची कामे करताना ...

अहमदनगर : रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेताना गटार व जलवाहिनीच्या कामाचे नियोजन केले जाते. मात्र, शहरातील रस्त्यांची कामे करताना हे नियोजनच होत नसल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. फलटण पोलीस चौकी ते सर्जेपुरा रस्त्याचे काम सुरू होऊन तीन महिने झाले. हे काम सुरू झाल्यानंतर या मार्गावर फेज-२ चे काम सुरू केले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू होण्यास विलंब हाेत आहे.

महापालिकेने फलटण पोलीस चौकी ते सर्जेपुरा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सदर रस्ता दुरुस्तीसाठी खोदण्यात आला. रस्ता खोदून तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला. सर्जेपुरा चौकात हे काम सुरू आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने पुन्हा फेज-२ योजनेतंर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी भुयारी गटारीचे काम करण्यात आले. हे काम पूर्ण होऊन एक महिला उलटला. त्यानंतर आता पुन्हा फेज-२ चे काम हाती घेतले आहे. पाणी योजना, भुयारी गटारीची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने रस्ताकाम अधर्वट आहे. महापालिकेला आधी भुयारी गटार व पाणी योजनेचे काम करायचे होते, तर रस्ता खोदला कशासाठी, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने रस्त्याचे काम हाती घेतले. रस्ता खोदला. पुणे महामार्गावरून बाजारपेठेत जाणारा हा रस्ता असल्याने या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच या मार्गावर दुकानांची संख्याही मोठी आहे. रस्ता वाहतुकीसाठी याेग्य नसल्याने दुकानदारांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद होते. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर दुकानदारांनी व्यवसाय सुरू केले. मात्र, या मार्गावर कमालीची धूळ असल्याने दुकानातही कुणी येत नाही, असे या भागातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

...सूचना फोटो आहे.