शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचे काम बंद का? रस्ता अडविणाऱ्याचाच पालिकेला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:24 IST

श्रीगोंदा : शहरातील नगरपालिकेच्या मांडवगण रस्त्याचे काम मोहन भिंताडे यांनी अडविले आहे. त्यांनीच पालिकेला पत्र देऊन गट क्रमांक ९३० ...

श्रीगोंदा : शहरातील नगरपालिकेच्या मांडवगण रस्त्याचे काम मोहन भिंताडे यांनी अडविले आहे. त्यांनीच पालिकेला पत्र देऊन गट क्रमांक ९३० ते ११०६ दरम्यानचे काम बंद का? असा खुलासा मागितला आहे. यानंतर पालिकेने सुरू केलेले काम भिंताडे यांनी पुन्हा अडविले आहे. त्यामुळे अधिकारी, पदाधिकारीही आक्रमक झाले आहेत.

मोहन भिंताडे हे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मीनल भिंताडे यांचे पती आहेत.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी शहरातील रस्त्यांची परिस्थिती आणि काम आडविणाऱ्यांचा आडमुठेपणा, हतबल नगरपालिका याकडे नुकतेच लक्ष वेधले हाेते. त्यावर पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी मोहन भिंताडे यांनी श्रीगोंदा-मांडवगण रस्त्याचे काम अडवून सरकारी कामात अडथळा आणला म्हणून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली.

शहरातील ३३ कोटी खर्च करून १७ रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न नगरपालिकेकडून सुरू आहे; मात्र मांडवगण रस्त्यावर मोहन भिंताडे यांनी काम बंद पाडले. याबाबत न्यायालयाचा काम बंद ठेवण्याबाबत कोणताही मनाई हुकूम नाही, तरीही नगरपालिकेने सबुरीची भूमिका घेतली.

त्यातच मोहन भिंताडे यांनी पालिकेला लेखी पत्र देऊन मांडवगण रस्त्याचे काम बंद आहे. यावर त्यांनी लेखी खुलासा मागविला. त्यामुळे नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांनी या मुद्द्यावर एकत्र घेऊन पालिकेला वेठीस धरणाऱ्या व्यक्तीला धडा शिकविण्यासाठी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

---

पोलीस बंदोबस्तात काम सुरू करणार

नगरपालिकेने कामे करताना कुणावर अन्याय होऊ नये, ही भूमिका घेतली आहे. आता संयम संपला आहे. मांडवगण रस्त्याचे काम पोलीस बंदोबस्तात दोन दिवसात सुरू करणार आहे. आता आम्ही कामावर स्वत: थांबणार आहोत, अशी माहिती नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांनी दिली.

--

न्यायालयाचा कोणताही मनाई हुकूम नसताना मांडवगण रस्त्याचे काम आडविले आहे. त्यांनी शहरातील नागरिकांना वेठीस धरले आहे. पालिकेने पोलीस बंदोबस्तात काम करण्याचा उशिरा का होईना घेतलेला निर्णय चांगला आहे.

-सतीश बोरूडे,

सामाजिक कार्यकर्ते

-----

२२ मांडवगण रस्ता

श्रीगोंदा शहरातील मांडवगण रस्त्याचे रखडलेले काम.