शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
2
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
3
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
5
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
6
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
7
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
8
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
9
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
10
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
11
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
12
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
13
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
14
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
15
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
16
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
17
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
18
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
19
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
20
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ भोवतीच संशयाचे वलय

By admin | Updated: September 21, 2016 00:28 IST

श्रीरामपूर : श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्या स्वत:च्या नावे वाहन नोंदणीची कोणतीच माहिती अजूनपर्यंत नेवाशाच्या विकास घोरपडे यांना नाही


श्रीरामपूर : श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्या स्वत:च्या नावे वाहन नोंदणीची कोणतीच माहिती अजूनपर्यंत नेवाशाच्या विकास घोरपडे यांना नाही. त्याने कधीतरी दिलेल्या कागदपत्रांचा वापर करून त्यांच्या नावावर टिपर नोंदणी करून तो औरंगाबादला विकण्यात आला. हा टिपर श्रीरामपूर शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे. घोरपडे याच्या नावाचा गैरवापर करण्यामध्ये आरटीओचा एजंट शहाबाज शेख याचा हात असावा असा संशय पोलिसांना आहे. दरम्यान घोरपडे यांचे कागदपत्रं शेख याला मिळालीच कशी? या प्रश्नामुळे श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाभोवतीच आता संशयाचे वलय निर्माण होऊ पाहत आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १३ मालमोटारीची नोंदणी करण्यात आली. हा प्रकार उघडकीस येताच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने पोलिसांत गुन्हा दाखल केला.
आरोपींमध्ये आरटीओ कार्यालयातील शहाबाज शेख या एजंटाचाही समावेश आहे. नेवासा तालुक्यातील खलाल प्रिपींच्या विकास घोरपडे यांनी कधीतरी आरटीओ कार्यालयात जमा केलेल्या कागदपत्रांचा वापर करून त्यांच्या नावावर एक टिपर नोंदविण्यात आला. तो टिपर नंतर औरंगाबाद कार्यालयांतर्गत नोंदणी करून तिकडे विक्री करण्यात आला. घोरपडे यांच्या नावाची कागदपत्रे आरटीओ कार्यालयात असताना ती एजंट शेख याला मिळालीच कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच या बनावट नोंदणी प्रकरणात आरटीओ कार्यालयाभोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे.
पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी औरंगाबाद येथे विक्री झालेला टिपर हस्तगत केला आहे. दरम्यान पवार यांनी नेवाशाच्या घोरपडे यांच्यासंदर्भात माहिती घेतली असता स्वत:च्या नावे वाहन नोंदणी झाल्याबद्दल ते स्वत:च अनभिज्ञ असल्याचे समोर आले. यातील मुख्य आरोपी गुरूमुखसिंग संधू व एजंट शहाबाज शेख हे दोघेही फरार आहेत. त्यामुळे पोलिसांना या गुह्याचे धागेदोरे जुळविण्यात विलंब होत आहे. (प्रतिनिधी)