रिक्षा संघटनेने केले तारकपूरला वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:39+5:302021-07-14T04:23:39+5:30

या कार्यक्रमास जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष तथा महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश घुले, नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ...

Rickshaw Association planted trees at Tarakpur | रिक्षा संघटनेने केले तारकपूरला वृक्षारोपण

रिक्षा संघटनेने केले तारकपूरला वृक्षारोपण

या कार्यक्रमास जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष तथा महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश घुले, नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बहिरू कोतकर, तारकपूर आगारप्रमुख अभिजित आघाव, ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक सुदाम देशमुख, सहाय्यक अधीक्षक विठ्ठल केगारकर, प्रमुख सल्लागार विलास कराळे, संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता वामन, सरचिटणीस अशोक औशीकर, सेक्रेटरी लतिफ शेख, तारकपूर रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष सुधाकर साळवे, उपाध्यक्ष फारुक शेख, मनोहर खूपचंदानी, प्रकाश गोसावी, नासीर खान, कयूम सय्यद, अनिल वैरागर, राजू शेख, सादिक शेख, अशोक वैरागर, अनिल अवचिते, आमीन सय्यद, सचिन जाधव, सुलेमान शेख, सादिक शेख, फारुक शेख, प्रकाश गोसावी, गणेश आटोळे, राजू टिपरे, नसीर शेख आदींसह रिक्षाचालक उपस्थित होते. प्रास्ताविकात विलास कराळे म्हणाले, शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असताना नागरिकांना दळणवळणाची सुविधा देण्याचे उद्दिष्ट या रिक्षा स्टॉपच्या माध्यमातून साध्य केले जाणार आहे. दत्ता वामन यांनी स्वागत केले. अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले म्हणाले, उपनगराची झपाट्याने वाढ होत असताना दळणवळणासाठी नागरिकांना रिक्षाची गरज भासते. या रिक्षा स्टॉपमुळे तारकपूर बसस्थानकावर येणाऱ्या सर्व शहरातील नागरिकांना प्रामाणिकपणे सोय होणार आहे. कोरोनाकाळात महागाई वाढली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना फटका बसला आहे. रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांसाठी संघटित राहण्याची गरज आहे, अशी अपेक्षा घुले यांनी व्यक्त केली.

--------

फोटो- १२ तारकपूर

अहमदनगर शहरातील तारकपूर बसस्थानकात रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सभापती अविनाश घुले, विलास कराळे, दत्ता वामन, अशोक औशीकर, अभिजित आघाव, बहिरू कोतकर आदी.

Web Title: Rickshaw Association planted trees at Tarakpur