शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वाळू विक्री दरात कपात

By admin | Updated: January 13, 2016 23:51 IST

अहमदनगर : चोरट्या मार्गाने होणारा वाळू उपसा, पोलीस आणि महसूल प्रशासनाची मेहरनजर आणि किचकट लिलाव प्रक्रिया यामुळे जिल्ह्यातील वाळू भूखंड विक्रीस थंडा प्रतिसाद मिळत आहे़

अहमदनगर : चोरट्या मार्गाने होणारा वाळू उपसा, पोलीस आणि महसूल प्रशासनाची मेहरनजर आणि किचकट लिलाव प्रक्रिया यामुळे जिल्ह्यातील वाळू भूखंड विक्रीस थंडा प्रतिसाद मिळत आहे़ त्यामुळे वाळुच्या शासकीय दरात २५ टक्के कपात करून आॅनलाईन बोली लावण्याच्या निर्णयापर्यंत प्रशासन आले आहे़ वारंवार प्रक्रिया राबवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनावर ही नामुष्की ओढावली असून, कपातीसह पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे़ त्यामुळे प्रशासनाच्या कोट्यवधींच्या महसूलावर पाणी फिरणार आहे़ जिल्ह्यातील ६४ वाळू भूखंड लिलाव करण्यास वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाने मंजुरी दिली़ ग्रामसभांनी त्यास होकार दिला़ अनेक अडथळे पार केल्यानंतर निम्म्यापेक्षा कमी भूखंड विक्रीसाठी खुले झाले़ तर २४० भूखंड विविध विभागांच्या परवानगीत अडकले़ परवानगी मिळालेल्या ६४ वाळुसाठे विक्रीसाठी आॅनलाईन बोली लावण्यात आली़ या प्रक्रियेला मोठ्याप्रमाणात प्रसिद्धीही दिली गेली़ मात्र, त्यास थंडा प्रतिसाद मिळाला़ वाळू व्यावसायिकांनी बोली लावणे तर दूरच, पण सहभागीही झाले नाहीत़ पाचवेळा ही प्रक्रिया राबविली गेली़ सहाव्यावेळी एकानेही अर्ज दाखल केला नाही़ गेल्या चार महिन्यांत राबविल्या गेलेल्या आॅनलाईन लिलाव प्रक्रियेवर प्रकाश टाकल्यास ही संपूर्ण प्रक्रिया सपशेल अपयशी ठरल्याचे दिसते़ चार महिन्यांत अवघ्या १० भूखंडांची विक्री झाली़ त्यातून सरकारला महसूलही मिळाला़ तुलनेत विक्री झालेल्या वाळू साठ्यांची संख्या अत्यल्प आहे़ त्यामागील कारणे न शोधता थेट २५ टक्के कपात करण्यात येत आहे़ तसा प्रस्तावही गौण खनिज विभागाने तयार केला असून, कायद्याचा आधार घेऊन कपातीचे धोरण राबविण्यात येत आहे़ शासकीय दरात कपात करून उर्वरित ५२ भूखंडासाठी पुन्हा प्रक्रिया राबविली जाणार आहे़ प्रक्रियेस प्रतिसाद मिळावा, यासाठी ही कपात करण्यात आली आहे़ मात्र, ती केल्यानंतर तरी प्रतिसाद मिळेल का, या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडेही नाही़ गतवर्षीही प्रतिसाद मिळाला नाही़ म्हणून कपात करून निविदा मागविण्यात आल्या होत्या़ परंतु त्यासही प्रतिसाद मिळाला नाही़ त्यामुळे यावेळी शासकीय दरात २५ टक्के कपात करून काही उपयोग होईल, असे वाटत नाही़ शासकीय दर हे बाजारातील दरापेक्षाही कमी आहेत़ असे असतानाही लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याने पाणी नेमके मुरतेय कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे़ मुळा, गोदावरी, प्रवरेतून बेकायदा उपसा गोदावरी नदी- कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासा आणि शेवगाव तालुक्यातून वाहते़ या तिन्ही तालुक्यांतून वाळूचा बेकायदा उपसा सुरू आहे़ त्यामुळे या नदीतील वाळू साठ्यांच्या विक्रीसही प्रतिसाद मिळत नाही़ मुळा नदी -पारनेर, नेवासा, राहुरी, संगमनेर तालुक्यातून वाहते़ राहुरी आणि नेवासा तालुक्यातून वाळूचा चोरट्या मार्गाने उपसा सुरू असल्याने नदी पात्रातील वाळुसाठे गायब झाले आहेत़ प्रवरा नदी नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, अकोले, संगमनेर आणि राहाता तालुक्यातून वाहते़ या नदीत पात्रातील वाळूचा बेकायदा उपसा सुरू आहे़ कुकडी पारनेर तालुक्यातून वाहत असून, या नदीतून वाळूचा उपसा सुरू आहे़ याशिवाय दक्षिण नगर जिल्ह्यातील घोड आणि भीमा नदीतून बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू आहे़ बेकायदेशीर वाळू उपसा जोरात सुरू असल्याने लिलावाकडे वाळूमाफियांनी पाठ फिरविली आहे़ (प्रतिनिधी)