श्रीरामपुरात नव्वदीतील ज्येष्ठांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:24 IST2021-08-26T04:24:12+5:302021-08-26T04:24:12+5:30

श्रीरामपूर शहराच्या जडणघडणीमध्ये येथील नगरपालिकेतील कामगार, वकील, डॉक्टर्स, शिक्षक या सर्वांचाच मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांच्याकडे आजही नव्या पिढीला ...

Reception of seniors in the nineties at Shrirampur | श्रीरामपुरात नव्वदीतील ज्येष्ठांचा सत्कार

श्रीरामपुरात नव्वदीतील ज्येष्ठांचा सत्कार

श्रीरामपूर शहराच्या जडणघडणीमध्ये येथील नगरपालिकेतील कामगार, वकील, डॉक्टर्स, शिक्षक या सर्वांचाच मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांच्याकडे आजही नव्या पिढीला देण्यासारखे विचारांचा ठेवा आहे. मात्र कोविडच्या भीतीमुळे व कुटुंबीयांच्या आग्रहास्तव ज्येष्ठांना घराबाहेर पडणे सध्या मुश्कील झाले आहे. त्यामुळे छल्लारे यांनीच ज्येष्ठांकडे जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेण्याचे ठरविले. आजअखेर त्यांनी ४० ज्येष्ठांची भेट घेतली आहे. अजूनही त्यांचा उपक्रम सुरू आहे. कुठलाही जातीभेद, पक्षभेद, गरीब व श्रीमंत असा भेदाभेद न करता सर्वच ज्येष्ठांचा त्यांनी सत्कार घडवून आणला आहे.

ज्येष्ठांमध्ये शंकरराव आगे, हेरंब औटी, जलीलभाई पठाण, भीमजीभाई पटेल, पांडुरंग परदेशी, वसंतराव बोरावके, डॉ.एन.जी.चौधरी, सृष्टीपाल धुस्सा, फादर ज्यो गायकवाड, फादर मँथ्यू, तुळशीराम परदेशी, बबनराव फासाटे, जनार्दन नागले, ताराचंद दुग्गल, रामशेठ वलेशा, जगजितसिंग चुग, बाळासाहेब बोर्डे, बाबूभाई मोहम्मद शेख, ॲड.अच्युतराव चव्हाण, शंकरराव अनारसे, मानकचंदजी कर्नावट आदींचा समावेश आहे. या उपक्रमामध्ये संजय छल्लारे यांना उद्योजक भरत कुंकूलोळ यांची मोलाची साथ लाभली आहे.

---------

फोटो ओळी : ज्येष्ठ नागरिक

शहरातील बाळासाहेब बोर्डे यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार करताना संजय छल्लारे व भरत कुंकूलोळ.

--------

Web Title: Reception of seniors in the nineties at Shrirampur