शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीगोंद्या’साठी रासप आक्रमक

By admin | Updated: August 20, 2014 23:27 IST

श्रीगोंदा : महायुतीकडे रासपने १०-१२ जागा मागितल्या आहेत. श्रीगोंद्याच्या जागेवरील हक्क रासप सोडणार नाही, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला आहे.

श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीत महायुतीकडे रासपने १०-१२ जागा मागितल्या आहेत. राज्यात एखाद्या जागेवर तडजोड करण्याची भूमिका घेऊ. मात्र श्रीगोंद्याच्या जागेवरील हक्क रासप सोडणार नाही, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला आहे.श्रीगोंदा येथे रासपचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांच्या नागरी सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात जानकर बोलत होते. जानकर पुढे म्हणाले की, पंकजा मुंडे माझ्या भगिनी असून, बाळासाहेब नाहाटा माझे बंधू आहेत. तुम्ही नाहाटांना मदत करा, त्यांना नामदार करण्याची जबाबदारी माझी आहे. सर्वसामान्य जनतेच्या जीवावर साम्राज्य उभ्या करणाऱ्या पाचपुते-नागवडेंनी कुकडी घोडचा पाणी प्रश्न सोडविला का? त्यांनाच किती दिवस आमदारकीची संधी द्यावयाची. आता सामान्य बहुजन दिनदलित झोपडीतील माणसाच्या हाती सत्ता देण्याची वेळ आली आहे. गोपीनाथ मुंडेंमुळे माझी उंची वाढली आहे. राज्यात गोपीनाथ मुंडे व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे महायुतीचे सरकार आणायचे आहे. महायुतीची साखळी भक्कम आहे. ही साखळी तुटणार कधीही नाही. जागा वाटपाबाबत मी राजू शेट्टी, विनायक मेटे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शाह यांची भेट घेणार आहोत. मला आमदार व्हायचे नाही. मी केंद्रात जाणार आहे. केंद्रात राज्य आमचे आहे. माझ्या सहकारी नेत्यावर खोट्या केसेस करण्याच्या फंदात पडू नये, असे जानकर म्हणाले.बाळासाहेब नाहाटा म्हणाले, लहान माणसांनी विस्थापितांचे नेतृत्व पुढे आणले, परंतु विस्थापित नेतृत्व प्रस्थापित झाले. लहान माणसाचा त्यांना विसर पडला. आता सत्तेसाठी ते पुन्हा उड्या मारीत आहेत. विधानसभची निवडणूक लागली की घोड व विसापूर धरणाची उंची वाढविण्याची घोषणा, काष्टी ग्रामपंचायतीची निवडणूक लागली की, अकलुज माळीनगर करण्याचे स्वप्न दाखविले जाते. कुकडीचे आवर्तन दिले नाही. नगर-दौंड रस्त्याचा प्रश्न पवारांच्या अंगावर ढकलून दिला आहे, अशी जोरदार टीका नाहाटा यांनी केली़ यावेळी दशरथ चव्हाण, गुलाब रासकर, नंदकुमार ताडे, कांतीलाल कोकाटे यांची भाषणे झाली. याप्रसंगी माजी आमदार कुमार पाटील, विजय मोरे, बाळासाहेब महाडिक, भाऊसाहेब गोरे, संजय जामदार, नितीन पठारे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)