रमेश कोठारी यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST2021-08-18T04:26:55+5:302021-08-18T04:26:55+5:30

श्रीरामपूर : येथील ज्येष्ठ कार्यकर्ते पत्रकार रमेश घेवरचंद कोठारी यांची अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स (नवी दिल्ली) ...

Of Ramesh Kothari | रमेश कोठारी यांची

रमेश कोठारी यांची

श्रीरामपूर : येथील ज्येष्ठ कार्यकर्ते पत्रकार रमेश घेवरचंद कोठारी यांची अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स (नवी दिल्ली) या संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. कॉन्फरन्सचे अध्यक्ष पारस मोदी यांच्या नेतृत्वाखालील जय जिनेंद्र ग्रुपच्या माध्यमातून ही निवड झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदी आनंदकुमार छल्लाणी (चेन्नई) यांची नुकतीच निवड घोषित झाली. त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. त्यामध्ये रमेश कोठारी यांचा समावेश आहे. रमेश कोठारी हे जैन कॉन्फरन्सचे आजीव सभासद आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये यापूर्वी ते सदस्य होते. नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक, भारतीय जैन संघटनेचे माजी नगर जिल्हाध्यक्ष, बाजार समिती, मर्चंटस् असोसिएशन व पीपल्स बॅंकेचे माजी अध्यक्ष होते. प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष, सिद्धाचलम ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त, लोकमान्य मंडळाचे अध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले आहे. निवडीबद्दल त्यांचे जैन कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष विलास लोढा, झोन चारचे मावळते अध्यक्ष सतीष लोढा, नूतन अध्यक्ष मदनलाल लोढा यांनी कौतुक केले आहे.

-------------

फोटो आहे : रमेश कोठारी

-------

Web Title: Of Ramesh Kothari