शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली!

By admin | Updated: October 23, 2014 14:46 IST

संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे़ मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली़

अहमदनगर : संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे़ मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली़ त्यामुळे मनसे आता १३ फूट खाली गेली आहे, असा टोला रिपाइंचे अध्यक्ष खा़ रामदास आठवले यांनी येथे लगावला. राज्यात भाजपासोबत जाताना सत्तेत दहा टक्के वाटा मिळावा, अशी बोलणी झाली होती़ मात्र, आठपैकी आमची एकही जागा निवडून आली नाही़ त्यामुळे आता किमान दोन मंत्रिपदे आणि महामंडळात आम्हाला सहभाग मिळावा, अशी मागणी केल्याचे खा़ आठवले म्हणाले. विधानसभा निवडणुकीत रिपाइंच्या वाट्याला आठ जागा आल्या होत्या मात्र, अगदी शेवटच्या टप्प्यात आमच्या उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले़ युतीच्या घोळात हा विलंब झाला़ या आठ जागा अगदी दोन ते चार हजारांच्या फरकाने हातातून गेल्या़ तरी एकही जागा जिंकता आली नाही, याची सल मनात आहे़ एकही जागा आली नसली तरी रिपाइंची मते ही भाजपासाठी प्रत्येक मतदारसंघात ग्रेसमार्क सारखी ठरली आहेत़ विधानसभेत निळा आणि भगवा फडकावा हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते़ मात्र, शिवसेना आणि भाजपामधील नेत्यांच्या इगोमुळे युती तुटली़ युती टिकावी, यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले. राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)