मुळा धरणावर पाऊस थांबला; जायकवाडीकडे प्रवाह सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 13:11 IST2020-09-28T13:10:56+5:302020-09-28T13:11:03+5:30
मुळा धरणावर पावसाने विश्रांती घेतली आहे. तरीही मुळा धरणाकडे पाण्याची ८८६ क्युसेकने आवक सुरू आहे. जायकवाडी धरणाकडे तीन हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरू आहे.

मुळा धरणावर पाऊस थांबला; जायकवाडीकडे प्रवाह सुरूच
राहुरी : मुळा धरणावर पावसाने विश्रांती घेतली आहे. तरीही मुळा धरणाकडे पाण्याची ८८६ क्युसेकने आवक सुरू आहे. जायकवाडी धरणाकडे तीन हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरू आहे.
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात २५ हजार ७९७ दशलक्ष घनफूट म्हणजेच ९९.२१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा २१ हजार २९७ दशलक्ष घनफूट इतका आहे. कोतूळ येथे आजपर्यंत ७७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळानगर येथे ९७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मुळा धरणावर पाऊस थांबला आहे. त्यामुळे सध्याचा २५ हजार ७९७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा कायम ठेवून उर्वरित येणारे पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. पावसाचा अंदाज व मधल्या भागातील आवक लक्षात घेऊन पाणी किती कमी करायचे याचा निर्णय घेण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.