राहुरीत चंदन तस्कर जेरबंद

By Admin | Updated: November 15, 2014 23:38 IST2014-11-15T23:36:37+5:302014-11-15T23:38:02+5:30

राहुरी : चिचोंडी पाटील (ता. नगर) येथून विक्रीसाठी घेऊन चाललेले आठ लाखांचे चंदन पोलीस व वन विभागाच्या संयुक्त कारवाईत राहुरी येथे जप्त करण्यात आले.

Rahuri Chandan smuggler Jeraband | राहुरीत चंदन तस्कर जेरबंद

राहुरीत चंदन तस्कर जेरबंद

राहुरी : चिचोंडी पाटील (ता. नगर) येथून विक्रीसाठी घेऊन चाललेले आठ लाखांचे चंदन पोलीस व वन विभागाच्या संयुक्त कारवाईत राहुरी येथे जप्त करण्यात आले. यात पोलिसांनी दोघांना अटक केली असून, इतर फरार आहेत.
चिचोंडी पाटील येथून अ‍ॅपे रिक्षातून (एमएच ०९ ६५०८) चंदनाची लाकडे वाहून नेली जात असल्याची माहिती खबऱ्यामार्फत वन विभागाचे रमेश देवखिळे, उपवनरक्षक गुलाबराव वळसे व ए़ सी़ ढेरे यांना मिळाली़ त्यांनी तात्काळ या अ‍ॅपेचा पाठलाग सुरू केला. अ‍ॅपे नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने निघाली होती.
अ‍ॅपे राहुरी येथे आली असता स्कॉर्पियोमधून आलेल्या काही लोकांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यात सुरूवात केली. त्यांचे चंदनावरून वाद सुरू झाले. भांडणे सुरू झाल्यानंतर लोकांनी गर्दी केली़ पोलीस घटनास्थळी आल्यानंतर अ‍ॅपेमधील अब्दुल गफूर व अब्दुल नासार (दोघेही राहणार केरळ ) यांना ताब्यात घेण्यात आले़ गोंधळाचा फायदा घेत स्कॉर्पिओमधील सर्वजण पसार झाले. स्कॉर्पिओ घोडेगाव येथील नितीन शिरसाट यांच्या मालकीची असल्याचे पोलिसांकडून कळते. वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी रिक्षाची पाहणी केली़ त्यामध्ये आठ लाख रूपयांचे चंदन दडविल्याचे आढळून आले़ अधिकाऱ्यांनी चंदन ताब्यात घेतले़ राहुरी न्यायालयात आरोपींना उभे केले असता १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Rahuri Chandan smuggler Jeraband