शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

मुळा कालव्यांचा विसर्ग घटवला

By admin | Updated: November 15, 2014 23:38 IST

राहुरी : मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने धरणातून रब्बीसाठी सुरू असलेले आवर्तन कमी करण्यात आले आहे.

राहुरी : मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने धरणातून रब्बीसाठी सुरू असलेले आवर्तन कमी करण्यात आले आहे. दोन्ही कालव्यांचा विसर्ग घटवण्यात आल्याची माहिती पाटबंधारे खात्याने दिली. बहुतेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पाण्याचा विसर्ग कमी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली़ अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून दोन्ही कालव्यांचे पाणी बंद करायचे की नाही यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले आहे. पाणी वापर संस्थांशीही चर्चा सुरू आहे़२६ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या २१.२९८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उजव्या कालव्यातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग शनिवारी पहाटे तीन वाजता १६५२ वरून ११५२ क्युसेकवर कमी करण्यात आल्याची माहिती धरण अभियंता राजेंद्र कांबळे यांनी दिली़ डाव्या कालव्याचा ३२० ने सुरू असलेला विसर्ग २६० क्युसेकवर आणण्यात आला. मुळा धरणाच्या लाभक्षेत्रावर पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे (मिलीमिटरमध्ये) : नगर ३८, मुळानगर ६०, राहुरी ६८, वांबोरी ८०, कुकाणा ७३, अमरापूर १५०, माका ९०, कासार पिंपळगाव १५५, भातकुडगाव ९२, कोतूळ २७,देवळाली प्रवरा २२, ब्राम्हणी ७५, ताहाराबाद ३५, टाकळीमिया ६८़दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे मुळा धरणामध्ये ११० दलघफू नवीन पाण्याची नोंद झाली.पारनेर भागातून काही प्रमाणावर पाणी धरणात येऊन मिळाले़ धरणाच्या फुगवट्याच्या भागात पावसाने हजेरी लावली़ सकाळी पाणलोट व लाभक्षेत्रावर हलक्या सरी बरसल्या. मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते़ दिवसभर ढगाळ हवामान होते़ त्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही़मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून आतापर्यंत शेतीसाठी २७०० दलघफू पाण्याचा वापर झाला़ काल पाऊस पडल्याने धरणाच्या पाण्याची बचत होण्यास मदत होणार आहे़ शेतीसाठी सोडण्यात आलेल्या आवर्तनाबाबत पाटबंधारे खात्याचा सर्व्हे सुरू आहे़ पाणी वापर संस्थांशी चर्चा करून पाण्याची गरज किती यासंदर्भात माहिती मागविण्यात आली आहे़ त्यानंतर दोन्ही कालव्यांतून पाणी सुरू अथवा बंद करण्यावर शिक्कामोर्तब होईल. (तालुका प्रतिनिधी)