नांदगावमध्ये कलाकेंद्रावर राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST2021-03-26T04:20:11+5:302021-03-26T04:20:11+5:30
अहमदनगर : नगर तालुक्यातील नांदगाव येथे कलाकेंद्रावर काही उपद्रवींनी राडा घालून दुचाकी व चारचाकीची मोडतोड केली तसेच कलाकेंद्रातील बारा ...

नांदगावमध्ये कलाकेंद्रावर राडा
अहमदनगर : नगर तालुक्यातील नांदगाव येथे कलाकेंद्रावर काही उपद्रवींनी राडा घालून दुचाकी व चारचाकीची मोडतोड केली तसेच कलाकेंद्रातील बारा हजार रुपयांची रक्कम बळजबरीने चोरून नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ मार्च रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली.
नांदगावजवळ भगवती कलाकेंद्र आहे. या कलाकेंद्रात गुरुवारी मध्यरात्री अनोळखी सहा व्यक्तींनी प्रवेश केला. त्यांनी कलाकेंद्रात धुडगूस घालून १२ हजार २५० रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली, तसेच कलाकेंद्राच्या परिसरात आठ ते नऊ मोटारसायकली व एक चारचाकी वाहनाची तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर हे आरोपी दुचाकी आणि चारचाकीमध्ये निघून गेले.
याप्रकरणी सतीश महेश काळे (वय २८, रा. वाळवणे, ता. पारनेर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आठरे करत आहेत.